2023 मध्ये भारतीयांनी गुगलवर सर्वाधिक काय सर्च केले? जाणून घ्या सर्वात जास्त सर्च केलेले 10 विषय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Google Year in Search 2023 : वर्ष 2023 संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. अशा वेळी नवीन आर्थिक वर्ष 2024 हे सुरु होणार आहे. अशा वेळी वर्षाच्या शेवटाला आम्ही तुम्हाला गुगलचा एक रिपोर्ट दिसणार आहे, ज्यामध्ये चालू वर्ष 2023 मध्ये भारतीयांनी गूगलवर सर्वात जास्त काय सर्च केले याची यादी दिली आहे. तुम्ही सविस्तर त्याबद्दल खाली जाणून घ्या.

Chandrayaan-3

Google ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, चांद्रयान-3 च्या ऐतिहासिक यशाने बातम्यांच्या जगामध्ये हेडलाईन बनवले, लोकांनी या घटनेबद्दल देशांतर्गत ते जागतिक स्तरावर शोध घेतला. हा कार्यक्रम देखील महत्वाचा होता कारण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर देशाचे हे पहिले यशस्वी लँडिंग होते.

Karnataka Election Results

यानंतर कर्नाटक निवडणूक निकालांचा सर्वाधिक शोध घेण्यात आला. कर्नाटक विधानसभेचे सर्व 224 सदस्य निवडण्यासाठी 10 मे 2023 रोजी कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. जिथे काँग्रेसने 135 जागा जिंकून आपले सरकार स्थापन केले. हा विषय देखील सोशल मीडियावर खूप चर्चेत होता.

Israel News

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा सर्वाधिक शोध भारतीयांनी सोशल मीडियावर घेतला आहे. या युद्धात दोन्ही बाजूंचे सैनिक मरण पावले होते.

Satish Kaushik

चित्रपट निर्माते आणि अभिनेते सतीश कौशिक यांचे 9 मार्च रोजी निधन झाले. त्यामुळे सतीश कौशिक यांना गुगलवर अनेकदा सर्च करण्यात आले आहे.

Budget 2023

दरवर्षीप्रमाणे यावेळीही भारतीयांना अर्थसंकल्पाची माहिती मिळाली. केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी 01 फेब्रुवारी 2023 रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 सादर केला.

Turkey Earthquake

या वर्षी तुर्कीमध्ये विनाशकारी भूकंप झाला. या भूकंपात 45 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या भूकंपामुळे देश आर्थिकदृष्ट्याही कमकुवत झाला. ही घटना मोठ्या प्रमाणात गुगलवर सर्च करण्यात आली आहे.

Atiq Ahmed

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे माजी खासदार आणि माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अशा वेळी अतिक अहमदला गुगलवर अनेकदा सर्च करण्यात आले.

Matthew Perry

90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते मॅथ्यू पेरी यांनी वयाच्या 54 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. तो फ्रेंड्स या वेब सीरिजसाठी ओळखला जातो. यात त्याची भूमिका चँडलर बिंगची होती. त्याच्या मृत्यूनंतर, तो सोशल मीडियावर ट्रेंडिंग राहिला आणि Google वर सर्वाधिक शोधला गेला.

Manipur News

मणिपूर हिंसाचाराचीही सर्वाधिक चर्चा सोशल मीडियावर झाली आहे. मणिपूरमध्ये 3 मे रोजी मेईटेई (खोऱ्याचे वर्चस्व असलेला समुदाय) आणि कुकी जमाती (पहाडी-बहुल समुदाय) यांच्यात हिंसाचार सुरू झाला.

Odisha Train Accident

2 जून 2023 रोजी बालासोर, ओडिशात रेल्वे अपघात झाला. कोरोमंडल एक्सप्रेस (12841) आणि मालगाडी (कोरोमंडल एक्सप्रेस टक्कर) यांच्यात जोरदार टक्कर झाली. या घटविषयी जाणून घेण्यासाठी अनेक वेळा लोकांनी गुगल सर्च केले आहे.