हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताने 2024 मध्ये विविध क्षेत्रात प्रगती केली आहे. नवीन कल्पना आणि शोधामुळे ते नेहमी आघाडीवर असते. एआयच्या विस्तारामुळे अनेक क्षेत्रात प्रगती होताना दिसत आहे. हे आतापर्यंतचे टॉप इंनोव्हेशन असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने फक्त भारतातच नाही तर जगामध्ये प्रगती करून दाखवलेली आहे. तर चला जाणून घेऊयात टॉप इंनोव्हेशनची माहिती.
एआयचा विस्तार
एआयचा विस्तार एवढा वाढला आहे कि, याचा वापर आरोग्य क्षेत्रातही केला जात आहे. त्यामध्ये व्यक्तीच्या निदानापासून वैयक्तिक उपचारांपर्यंत याचा वापर वाढला आहे. एआय चलित प्लॅटफॉर्मवर रोगांचे भविष्यवाणी, निदान आणि उपचारांची माहिती मिळते. यामध्ये उदाहरण घायचे झाले तर , निरामाई सारखी एआय साधने मशिन लर्निंगचा वापर करून स्तन कर्करोगाचे पहिल्या टप्प्यावर निदान करतात, तर सिगट्युपल एआयच्या मदतीने वैद्यकीय प्रतिमांचे विश्लेषण करता येते.
इलेक्ट्रिक वाहन विस्तार
भारतात इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे. नवीन स्टार्टअप्सपासून ते स्थापन झालेल्या कंपन्यांपर्यंत EV वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने जलद चार्जिंग स्टेशन आणि सुधारित बॅटरी तंत्रज्ञान विकसित केली जात आहेत. टाटा मोटर्स आणि महिंद्रा इलेक्ट्रिक विविध प्रकारची इलेक्ट्रिक वाहने तयार करत आहेत, तर एथर एनर्जी आणि ओला इलेक्ट्रिक या नवनवीन कल्पना घेऊन येत आहे.
रोबोटिक प्रक्रिया ऑटोमेशन
रोबोटिक प्रक्रिया ऑटोमेशन (RPA) व्यवसाय प्रक्रियांमध्ये, मानव संसाधन (HR) पासून वित्त आणि ग्राहक सेवा क्षेत्रापर्यंत लोकप्रिय होत आहे. यामुळे कार्यक्षमता वाढून त्यामधील चुका कमी होत आहेत. तसेच बचत होण्यासही मदत मिळत आहे. उदाहरण टीसीएस आणि विप्रो यांसारख्या कंपन्या बँकिंग आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील ग्राहकांसाठी RPA देत आहे.
कृषी तंत्रज्ञानातील प्रगती
कृषी क्षेत्रातील आव्हानांना उत्तर देण्यासाठी स्टार्टअप्स एआय, ड्रोन आणि डेटा ऍनालिस्ट सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांची उत्पादकता, कीड व्यवस्थापन आणि सिंचन प्रणाली सुधारत आहेत. यामध्ये ऍग्रोस्टार आणि देहात एआयचा वापर करून शेतकऱ्यांना डेटा आधारित निर्णय घेण्यात मदत करत आहेत, तर स्कायमेट ड्रोन आणि हवामान डेटा वापरून पिकांच्या आरोग्याची भविष्यवाणी करता येत आहे. त्यामुळे 2024 च्या टॉप इंनोव्हेशनमध्ये याला गणले जात आहे.