औरंगाबाद शहरात भारतातील पहिली अत्याधुनिक एम.आर.आय मशीन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : कोरोनामुळे संपूर्ण देशात वैद्यकीय सेवावरती विशेष लक्ष दिलेजात आहे. यात सर्व हॉस्पिटल, स्थानिक प्रशासन तसेच केंद्र शासन हे सुध्दा सामील आहेत. वैद्यकीय सेवांना आधुनिक आणि आणखीन प्रगतशील करण्यासाठी सर्व स्थरातून प्रयत्न होत आहेत.

याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरातील मेडिकव्हर हॉस्पिटलने भारतातील सर्वात पहिली ऍडव्हान्स टेकनॉलॉजि असलेली एम.आर.आय मशीन आणली आहे. या एम.आर.आय मशीनची विशेष बाब म्हणजे अवघ्या १५ ते २० मिनटात उत्तम दर्जाचे स्कॅन करून डॉक्तरांना रोगाचा तपास लावण्यातही मशीन डॉक्टरांना उपयोगी ठरेल. तसेच या मशीनमध्ये अत्याधुनिक सॉफ्टवेअर्स आहेत. यामुळे डॉक्टरांना लवकर आणि सोईस्कररित्या रुगणाला मशीनद्वारे तपासता येईल.

दरम्यान, आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते या मशीनचे लोकार्पण करण्यात आले. त्यांनी या प्रसंगी मेडिकव्हर हॉस्पिटलला शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. श्रीकांत सहस्रबुद्धे, डॉ. नेहा जैन, डॉ. विवेक देशमुख, डॉ. अजेया उकडगावकर आणि मेडिकव्हर हॉस्पिटलच्या जनसंपर्क अधिकारी सोनाली कंधारकर यांची उपस्थिती होती.

Leave a Comment