India’s Longest Expressway | देशामध्ये अनेक एक्सप्रेस हायवे तयार झालेले आहेत. अशातच देशातील सर्वात मोठा एक्सप्रेस मुंबई ते दिल्ली दरम्यान तयार होत आहे. हा देशातील सगळ्यात मोठा एक्सप्रेस महामार्ग असला, तरी दुसरा एक्सप्रेस महामार्ग देखील आहे. जो सुरत आणि चेन्नई या देशातून जातो. या एक्सप्रेसची लांबी तब्बल 1271 किलोमीटर एवढी आहे. तर मुंबई ते दिल्ली या एक्सप्रेसचे एकूण लांबी 1350 किलोमीटर एवढी आहे. हा एक्सप्रेस चेन्नईला सुरत सोबत जोडणार आहे. त्यामुळे आता पश्चिम घाटातूनही अनेक नागरिक प्रवास करू शकतात. या नवीन एक्सप्रेसचे काम दोन वर्षात पूर्ण होणार आहे. त्यामुळे या दोन शहरांमधील अंतर खूपच कमी होणार आहे आणि नागरिकांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे.
सध्या या एक्सप्रेसच (India’s Longest Expressway) काम नॅशनल हायवे ऑफ इंडिया हे पाहत आहे. या महामार्गावर 120 किलोमीटर प्रति तास एवढी वेगमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे या एक्सप्रेससाठी 50 कोटींचा निधी देखील खर्च करण्यात येणार आहे. हा एक्सप्रेस एकदा सुरू झाला की यावरून जवळपास 50 हजार गाड्या इतकी वाहतूक कोंडी रस्त्यावर कमी होणार आहे. सध्या हा महामार्ग चार लाईनमध्ये सुरू होत आहे. परंतु भविष्यातही तो वाढवून सहा ते आठ लेन एवढा देखील केला जाऊ शकतो.
चेन्नई ते सुरत यादरम्यान केलेल्या या हायवेमुळे दोन शहरांमधील अंतर आता 1700 किलोमीटर कमी होऊन 1270 किलोमीटर एवढे होणार आहे. या दोन शहरांमधील अंतर कापण्यासाठी 35 तास इतके लागतात. परंतु नवीन एक्सप्रेस तयार झाल्यावर हे अंतर फक्त आठ तास एवढे राहणार आहे. हा महामार्ग आठ मोठ्या राज्यातून जाणार आहे. यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तमिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. या राज्यातील अनेक शहरांना या महामार्गाचा फायदा होणार आहे. जसं की हा मार्ग तिरुपती कडप्पा, कुरनून, कलबुर्गी, सोलापूर, अहमदनगर आणि नाशिक या शहरांना जोडणार आहे.
नरेंद्र मोदी यांच्या भारतमाला परियोजना अंतर्गत चेन्नई ते सुरत या योजनेचे उद्घाटन ऑक्टोबर 2000 मध्ये करण्यात आलेले होते. त्याचप्रमाणे डिसेंबर 2025 ही हा मार्ग पूर्ण करण्याची डेडलाईन ठेवण्यात आलेली होती हा महामार्ग तयार झाला की दक्षिण भारताला पश्चिम भारतासोबत थेट जोडता येणार आहे. हा महामार्ग तयार झाल्यावर दोन्ही शहरांमधील व्यापार देखील वाढणार आहे. या नवीन महामार्गालगत रियलइस्टेट देखील डेव्हलप होणार आहे.