देशभरात मोठ्या शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीने अनेक रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. महत्वाची बाब म्हणजे भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्ग महाराष्ट्रात तयार होत असून हा मार्ग मुंबई आणि दिल्ली या देशातल्या दोन मोठ्या शहरांना जोडणार आहे.
उद्योगधंदे आणि वाहतुकीसाठी हा रस्ता अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा भुयारी मार्ग मुंबईच्या नॅशनल पार्क मधल्या जंगलातून जाणार आहे. या मार्गामुळे ठाणे ते बोरिवली हा प्रवास केवळ 12 मिनिटात पूर्ण होणार आहे. या मार्गाची उभारणी करण्यासाठी एमएमआरडीएने पावर फायनान्स कार्पोरेशन म्हणजेच (पी एफ सी) कडून कर्ज घेतले आहे. एमएमआरडीएने पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (PFC) कडून 31,673.79 कोटींचे कर्ज घेतले आहे.
मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (MMR) मधील नऊ प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी आर्थिक निधी उभारण्याकरिता हे कर्ज घेण्यात आले आहे. 31,673.79 कोटींच्या कर्जातील सर्वाधिक निधी ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पासाठी दिला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाणे ते बोरिवली या दुहेरी भुयारी मार्गाची पायाभरणी करण्यात आली. त्यामुळे ठाणे ते बोरवली या प्रवासात एका तासाची बचत होणार असून ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाचा हा १६,६०० कोटींचा प्रकल्पात त्यामुळे थेट कनेक्टिव्हिटी मिळणार असून ठाणे ते बोरिवली या दुहेरी मार्ग घोडबंदर रोड आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कमी होणार आहे.
भारतातला हा सर्वात लांब आणि मोठा शहरी भुयारी मार्ग आहे. या प्रकल्पाचे एकूण लांबी 11.8 km आहे त्यापैकी 10.25 किलोमीटरचा बोगदा असणार आहे . दोन्ही बोगद्यांमध्ये दोन मार्गाने एक आपातकालीन मार्गिका असणार आहे. त्यामुळे ठाणे ते बोरिवली हा प्रवास विना थांबा आणि सिग्नल रहित होणार आहे. 2018 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.




