Indias Most Expensive Mango | ‘हा’ आहे देशातील सर्वात महागडा आंबा; किंमत वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Indias Most Expensive Mango | उन्हाळ्याचा हंगाम सुरू झालेला आहे. हा उन्हाळा अनेकांना आवडत नाही. परंतु उन्हाळ्यामध्ये सगळ्यांना आवडणारी एक गोष्ट असते. ती म्हणजे उन्हाळ्याच्या या सीझनमध्ये आंबे येतात. आणि आंबे प्रत्येकालाच हवे हवेसे वाटतात. आता बाजारपेठेत अनेक आंबे उपलब्ध आहे. काही आंबे 100 रुपये तर 200 रुपये किलोने विकत आहेत. भारतामध्ये हापूस ही जात सगळ्यात महागडी जात आह. याशिवाय बदाम, दुसरी, तोतापुरी, लंगडा हे अनेक आंब्याचे प्रकार आहेत. परंतु तुम्हाला भारतातील सर्वात महागड्या आंब्याबद्दल माहित आहे का? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या जातीच्या आंब्याची फक्त तीन झाडे आहेत. ही आंब्याची जात महाग असण्यासोबत दुर्मिळ देखील आहे. त्याचप्रमाणे आंब्याची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल. हा सगळ्यात महाग आंबा प्रति तुकडा या दराने विकला जातो. या आंब्याची किंमत प्रत्येक किलो आंब्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने असते. आता या आंब्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया.

देशात आंब्याची फक्त तीन झाडे | Indias Most Expensive Mango

भारतातील सगळ्यात महागडा असणारा आंबा केवळ मध्यप्रदेशात पिकवला जातो. हा आंबा किलोच्या भावाने विकला जात नाही. या जातीच्या एका आंब्याची किंमत ही 1200 रुपये (Indias Most Expensive Mango) आहे. प्रत्येक प्रदेशातील अलीराजपुरमध्ये हा आंबा पिकवला जातो. या आंब्याची फक्त तीनच झाडे उपलब्ध आहे.

गेल्या वर्षी भोपाळमध्ये आयोजित केलेल्या आंब्याच्या महोत्सामध्ये अनेक जाती ठेवण्यात आलेल्या होत्या. यामध्ये आंब्याच्या अनेक जाती होत्या. या प्रदर्शनात अलीराजपुरमध्ये पिकवलेला नूरजहॉं आंबा ठेवण्यात आलेला होता. हात आंबा केवळ मध्य प्रदेशातच नाही तर देशातील एक वेगळा आंबा आहे.

अफगाणिस्तानातून आंब्याची झाडे आली |

नूरजहाँ आंबा संपूर्ण देशात खासदार वगळता कुठेही मिळत नाही. या आंबा उत्पादक रुमाल बघेल यांनी सांगितले की, आम्ही वर्षभरात केवळ 100 आंब्याचे उत्पादन करतो. मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतून हा आंबा खरेदी करण्याची मागणी होत आहे. रुमल बघेल यांच्या मते, नूरजहाँ आंबा अफगाणिस्तानमध्ये पिकवला जात होता.

1577 ते 1645 या काळात हा आंबा भारतात आणला गेला तेव्हा या आंब्याचे नाव मल्लिका नूरजहाँ ठेवण्यात आले. या आंब्याची काही रोपे मध्य प्रदेशातील अलीराजपूर येथे आणण्यात आली. तेव्हापासून येथे नूरजहाँ आंब्याचे उत्पादन सुरू झाले. संपूर्ण देशात फक्त तीन नूरजहाँ जातीची आंब्याची झाडे उरली आहेत.