…. तर मी शिवसेनेतूनही बाहेर पडेल; शिवतारेंच्या सूचक वक्तव्यामुळे शिंदेंच टेन्शन वाढलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगलेला पाहायला मिळत आहे. या सामन्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी उडी मारली आहे. शिवतारेंनी बारामती मतदारसंघातून लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु विजय शिवतारेंनी घेतलेल्या या भूमिकेमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली असताना देखील आपण बारामती लोकसभा मतदारसंघातून विजय मिळविणारच, वेळ आली तर शिवसेनेतूनही बाहेर पडू , अशी भूमिका शिवतारेंनी घेतली आहे.

मुख्य म्हणजे, राजकीय वर्तुळात या सर्व घडामोडी घडत असताना शिवतारेंनी सर्वांचे लक्ष वेधून घेणारे एक मोठे वक्तव्य केले आहे. “माझे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 25 वर्षांपासून घनिष्ठ नाते आहे आणि ते कायम असणार आहे. मला तर लोकसभा निवडणूक लढायचीच आहे, मात्र मुख्यमंत्र्यांना युतीचा धर्म पाळावा लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना अडचण असेल तर मी बाहेर पडण्यास तयार आहे. मी अपक्ष म्हणून उभा राहील” असे विजय शिवतारेंनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळेच पुढे जाऊन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सध्या सत्तेमध्ये अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे शिंदे गटातील विजय शिवतारे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे टेन्शन वाढले आहे. कारण की बारामती मतदारसंघातून शरद पवार गटाच्या बाजूने सुप्रिया सुळे लोकसभेसाठी उभ्या राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. तर अजित पवार गटाच्या बाजूने सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या सगळ्यातच बारामती लोकसभा मतदारसंघातून उभे राहण्याचा निर्धार शिवतारे यांनी केला आहे. आता वेळ पडली तर आपण शिवसेनेतूनही बाहेर पडू, असे शिवतारे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकिय वर्तुळात चर्चांना जोर आला आहे.