हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Indigo Airlines । देशातील आघाडीची विमानसेवा कंपनी म्हणून ओळखली जाणारी Indigo मोठ्या अडचणींचा सामना करत आहे. आज गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा सामना करावा लागला. याचा देशभरातील उड्डाणावर मोठा परिणाम बघायला मिळतोय. आज इंडिगोला तब्बल २०० विमानाची उड्डाणे रद्द करावी लागली. काही उड्डाणे तर शेवटच्या क्षणी रद्द करण्यात आली, ज्यामुळे प्रवाशांमध्ये संताप पाहायला मिळतोय. विमानतळाला अक्षरशः बस स्टॅन्ड सारखं स्वरूप आलंय इतकी प्रवाशांची गर्दी झालीय.
इंडिगो एअरलाइन्सला (Indigo Airlines) गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठ्या ऑपरेशनल अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे, देशभरात मोठ्या प्रमाणात विलंब आणि फ्लाईट्स रद्द झाल्याने हजारो प्रवासी अडकले आहेत. गेल्या दोन दिवसांत, अंदाजे २५० ते ३०० उड्डाणे रद्द करण्यात आली होती, आज आणखी काही उड्डाणे रद्द झाली आहेत. इंडिगोने सार्वजनिक माफी मागितली आहे. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली. एअरलाइनने म्हटले आहे की अनपेक्षित ऑपरेशनल अडचणींमुळे अनेक विमाने रद्द करण्यात आली तर काही उड्डाणे उशिरा झाली. किरकोळ तांत्रिक बिघाड, हिवाळ्यातील वेळापत्रकात बदल, प्रतिकूल हवामान परिस्थिती, विमानतळावर प्रचंड गर्दी आणि सुधारित क्रू रोस्टरिंग नियम या सर्वांमुळे अशा प्रकारची परिस्थिती ओढवली आहे.
विमान सेवेचे सर्व कामकाज पूर्वरत करण्यासाठी, इंडिगोने पुढील ४८ तासांसाठी त्यांच्या वेळापत्रकात कॅलिब्रेटेड बदल केले आहेत. इंडिगोच्या विमान सेवा बंद पडल्याने देशातील जवळजवळ प्रत्येक विमानतळावर परिणाम होत आहे. दिल्ली, बेंगळुरू, इंदूर, अहमदाबाद, हैदराबाद, वाराणसी आणि सुरत विमानतळांवर प्रवाशांची सर्वात जास्त अडचण झाली आहे.
आतापर्यंत रद्द झालेली विमान उड्डाणे (Indigo Airlines)
बेंगळुरू- ४२
दिल्ली- ३८
अहमदाबाद- २५
इंदूर- ११
हैदराबाद- १९
सुरत- ८
कोलकाता- १०




