Indigo प्रवाशांवर जमिनीवर बसून खायची वेळ; Video झाला व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध विमान कंपनी Indigo बाबत प्रवाशांच्या तक्रारी वाढल्याचे दिसत आहे. मागील आठवड्यात इंडिगो विमानात आसनव्यवस्था असलेल्या ठिकाणी मोडकी सीट पाहून एका महिला प्रवाशाने संताप व्यक्त केल्याचं आपण बघितलं होत, त्यानंतर फ्लाईट उशिरा आली म्हणून वैतागलेल्या प्रवाशाने थेट वैमानिकाच्या थोबाडीत मारली आणि आता तर Indigo चे प्रवासी जमिनीवर बसून जेवण करत असल्याचा विडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे नेमकं काय चाललंय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

त्याच झालं असं कि, सध्या थंडीचे दिवस असून धुक्यामुळे 14 जानेवारी रोजी गोव्याहून दिल्लीला येणारे इंडिगो विमान मुंबईकडे वळवण्यात आले, त्यानंतर प्रवाशांचा संयम सुटला आणि ते थेट खालीच जमिनीवर बसले आणि जेवण करू लागले. या व्हिडिओत आप्लं बघू शकता कि, रात्रीची वेळ आहे आणि पाठीमागे इंडिगो विमान आहे. त्याशेजारीच सर्व प्रवाशी खाली बसून भोजन करत आहेत. आणि एकमेकांशी गप्पा मारत आहेत. विमानतळावरच खाली बसलेल्या प्रवाशांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर इंडिगोने प्रवाशांची माफी मागितली आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक पावले उचलणार असल्याची ग्वाही दिली.

इंडिगोने परिस्थितीचे गांभीर्य बघता लगेच ट्विट करत याबाबत दिलगिरी व्यक्त केली. इंडिगोने म्हंटल, आम्हाला 14 जानेवारी 2024 रोजी गोव्याहून दिल्लीला येणा-या इंडिगो फ्लाइटशी संबंधित घटनेची माहिती आहे. दिल्लीत धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्याने आम्ही विमान मुंबईकडे वळवले. याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्ही आमच्या ग्राहकांना झालेल्या गैरसोयीची चौकशी करत आहोत आणि भविष्यात अशा कोणत्याही घटना टाळण्यासाठी आवश्यक पावले उचलू.