इंदुरीकर महाराजांनी ठाकरे-शिंदेंना केलं ‘हे’ आवाहन; धर्माबाबत म्हणाले की,

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात चांगलाच गोंधळ झाला आहे. शिवसेना या एकाच पक्षात दोन गट निर्माण झाल्यामुळे सध्या राज्यातील राजकारण तापले आहे. या राजकीय परिस्थितीवर इंदुरीकर महाराज यांनी भाष्य केलं असून त्यांनी थेट उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कीर्तनातून जाहीर आवाहन केलं आहे.

इंदुरीकर महाराज यांचे जळगाव येथे नुकतेच एक कीर्तन पार पडले. त्यांनी कीर्तनातून सध्याच्या शिवसेनेतील राजकीय परिस्थितीवर व धर्म संकटाबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, “धर्मावर संकट येईल तेव्हा पक्ष नेते बाजूला राहू द्या मनगटाला मनगट लावून एकत्र लढा. आज संकट माणसावर नाही तर धर्मावर आलेले असून धर्मावर आलेल्या संकटासाठी पक्ष, नेते यांना बाजूला ठेवून एकत्रित यावे.

नेते व पक्षापूर्ती धर्म मर्यादित ठेवला तर धर्माचे काम बिघडेल त्यामुळे धर्म वाचवणे ही काळाची गरज असून पक्ष नेते यांच्यामुळे निर्माण झालेले वैर सोडून धर्मासाठी एकत्र लढा,” असे आवाहन इंदुरीकर महाराज यांनी केले आहे.

इंदुरीकर महाराजांनी सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं आहे. अशात राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. नेहमीप्रमाणे हे अधिवेशनही वादळी ठरणार आहे. शिवसेना पक्ष नाव आणि निवडणुक चिन्हं धनुष्यबाण हे केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिकृतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यामुळे आता विधिमंडळात ठाकरे गटाचे आमदारांची काय रणनिती असणार? हे पहावे लागणार आहे.