हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील प्रमुख खाजगी बँकांपैकी एक असलेल्या इंडसइंड बँकेने एफडीवरील व्याजदरात बदल केले आहेत. या बदलामुळे गुंतवणूकदारांना मोठे गिफ्ट मिळालेले आहे. त्यांनी 1 वर्ष 5 महिने ते 1 वर्ष 6 महिन्यांच्या कालावधीसाठी एक एफडी योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये बँक सर्वाधिक व्याज दर ऑफर करत आहे. यामध्ये आपल्याला बँकेकडून आकर्षक व्याज दर मिळण्याची शक्यता आहे. या एफडीमध्ये गुंतवणूक करून आपल्याला लहान कालावधीत चांगला परतावा मिळू शकतो. जर तुम्ही देखील एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर हि तुमच्यासाठी चांगली संधी ठरू शकते.
आरबीआय रेपो रेट कमी –
अनेक तज्ञांच्या मते आरबीआय रेपो रेट कमी करू शकते. हे दर कमी झाल्यास एफडीवरील व्याज दरही कमी होऊ शकतात. त्यामुळे आधीच एफडी करणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे अधिक व्याज मिळवता येईल. बॅंकेने 3 कोटी रुपये पेक्षा कमी रकमेवरील एफडीसाठी ही सुधारणा केली आहे. बॅंक सामान्य ग्राहकांना 3.50% ते 7.75% पर्यंत व्याज देत आहे. तसेच सीनियर सिटीझन्ससाठी बॅंक जास्त 8.49% व्याजदर ऑफर करत आहे. सामान्य ग्राहकांपेक्षा सीनियर सिटीझन्सना 0.50% जास्त व्याज दिले जात आहे.
एफडीवरील व्याज दरात बदल –
इंडसइंड बॅंकेने आपल्या एफडीवरील व्याज दरात बदल केले असून, हे नवीन व्याज दर 26 नोव्हेंबर 2024 पासून लागू करण्यात आले आहेत. 7 ते 30 दिवसांच्या मुदतीतील एफडीवर 3.50% आणि 31 ते 45 दिवसांच्या मुदतीतील एफडीवर 3.75% व्याज दिले जात आहे. त्यानंतर 46 ते 60 दिवसांच्या एफडीवर 4.75%, 61 ते 90 दिवसांच्या एफडीवर 4.73% आणि 91 ते 120 दिवसांच्या एफडीवर 4.75% व्याज दर आहे. 121 ते 180 दिवसांच्या मुदतीतील एफडीवर 5%, तर 181 ते 210 दिवसांच्या मुदतीतील एफडीवर 5.85% व्याज दिले जात आहे. 270 ते 354 दिवसांच्या एफडीवर 6.35% आणि 355 ते 364 दिवसांच्या मुदतीवर 6.50% व्याज दिले जात आहे.
जास्त मुदतीच्या एफडीवर व्याज –
1 वर्ष 3 महिने ते 1 वर्ष 7 महिने मुदतीच्या एफडीवर 7.75% व्याज मिळते, तर 1 वर्ष 8 महिने ते 2 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 7.99% व्याज दर आहे. 2 वर्षे 6 महिने ते 3 वर्षे 3 महिने मुदतीत 7.25% आणि 3 वर्षे 3 महिने ते 5 वर्षे 1 महिने मुदतीत 7.25% व्याज दर लागू आहे. तसेच, 5 वर्षांपेक्षा जास्त मुदतीच्या टॅक्स सेविंग एफडीवर 7.25% व्याज दिले जाते. त्यामुळे ग्राहकांसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.