हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Infinix ने भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. Infinix Note 40 5G असं या मोबाईलचे नाव असून हा मोबाईल मागील वर्षी लाँच झालेल्या Infinix Note 40 Pro 5G और Infinix Note Pro+ 4G चे पुढचं व्हर्जन आहे. यामध्ये 108MP कॅमेरा, 5,000mAh बॅटरी आणि 8GB रॅमसह अनेक भन्नाट फीचर्स मिळत आहेत. मोबाईलला AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात…
6.78 इंच डिस्प्ले –
Infinix Note 40 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78 इंचाचा फुल HD + AMOLED डिस्प्ले आहे. या डिस्प्लेला 1300 nits पीक ब्राइटनेस आणि PWM dimming 2160Hz मिळतो. याचा डोळ्यांवर कमीत कमी परिणाम होतो. कंपनीने मोबाईल मध्ये octa-core MediaTek Dimensity 7020 चिपसेट बसवली असून इनफिनिक्सचा हा नवा स्मार्टफोन एंड्रॉयड 14 वर आधारित आहे.
कॅमेरा – Infinix Note 40 5G
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Infinix Note 40 5G मध्ये पाठीमागील बाजूला 108MP चा मुख्य कॅमेरा मिळतोय तर समोरील बाजूला विडिओ कॉल आणि सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे. हि बॅटरी हे 33 वॅट फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
किंमत आणि ऑफर–
मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Infinix Note 40 5G हा स्मार्टफोन 8GB रॅम+ 256GB स्टोरेज मध्ये उपलब्ध असून त्याची किंमत 19,999 रुपये आहे. . हा स्मार्टफोन काळ्या आणि सोनेरी रंगात लाँच करण्यात आला असून प्रसिद्ध इ कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर तो उपलब्ध आहे. मोबाईल खरेदीवर 2,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.