हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात मोबाईलचे वेड जवळपास सर्वच व्यक्तींना असून नवनवीन मोबाईल घेण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र कमी पैशात जास्तीत जास्त फीचर्स असणारा मोबाईल खरेदी करण्याकडे ग्राहक भर देत असतात. तुम्हीही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल आज आम्ही तुम्हाला अशा मोबाईलबद्दल सांगणार आहोत जो अवघ्या 13,499 रुपयांत लाँच झाला आहे. Infinix Note 40X 5G असं या स्मार्टफोनचे नाव असून यामध्ये 108MP कॅमेरा, 12GB रॅमसह अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. चला तर मग याबाबत अगदी सविस्तर जाणून घेऊयात…
6.78 इंचाचा डिस्प्ले –
Infinix Note 40X 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78 इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 500 निट्स पीक ब्राइटनैसचा सपोर्ट मिळतो. मोबाईल मध्ये MediaTek Dimension 6300 प्रोसेसर बसवण्यात आला असून हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. स्मार्टफोनमध्ये पंच-होल डिझाइन देण्यात आली आहे. इनफिनिक्सचा हा नवा हँडसेट 8 GB + 256 GB स्टोरेज आणि 12GB रॅम, 256GB स्टोरेज अशा २ स्टोरेज व्हेरिएन्टमध्ये लाँच करण्यात आला आहे.
कॅमेरा – Infinix Note 40X 5G
कोणताही मोबाईल खरेदी करत असताना फोटोग्राफीसाठी त्यातील कॅमेरा कसा आहे याकडे ग्राहकांचे लक्ष्य असते. हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेऊन कंपनीने Infinix Note 40X 5G मध्ये फोनमध्ये 108MP ट्रिपल AI कॅमेरा सेटअप दिला आहे. असा दावा केला जात आहे की कॅमेरा ॲप 15 पेक्षा जास्त मोडला सपोर्ट करतो, ज्यामध्ये ड्युअल व्हिडिओ, सुपर नाईट, फिल्म मोड इ.मोड आहेत. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. मोबाईल अनलॉक करण्यासाठी यामध्ये साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर आहे. तसेच फेस अनलॉक फीचर देण्यात आले आहे.
किंमत किती?
Infinix 40X 5G मोबाईलच्या 12GB आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे. तर 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 13,499 रुपये आहे. येत्या 9 ऑगस्ट 2024 पासून हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. तुम्ही प्रसिद्ध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट तसेच रिटेल स्टोअरमधून हा मोबाईल खरेदी करू शकता.