हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Infinix ने भारतीय बाजारात ग्राहकांना परवडेल अशा स्वस्तात मस्त किमतीत नवा मोबाईल लाँच केला आहे. Infinix Note 50x 5G+ असं या स्मार्टफोनचे नाव असून यामध्ये 8GB रॅम, 50MP कॅमेरा, 5500mAh बॅटरी यांसारखे दमदार फीचर्स मिळतात. कंपनीने मोबाईलची किंमत सुद्धा अतिशय कमी ठेवली आहे. Infinix Note 50x 5G+ च्या 6GB+128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी किंमत 11,499 रुपये ठेवण्यात आली आहे. तर ८ GB+ १२८ GB स्टोरेज व्हेरिएंट १२,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. येत्या ३ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता हा मोबाईल बाजारात विक्री साठी खुला होणार आहे. आज आपण या स्मार्टफोनची खास वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत.
डिस्प्ले – Infinix Note 50x 5G+
Infinix Note 50x 5G+ मध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट सह ६.६७-इंचाचा HD + LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. मोबाईल मधेय MediaTek Dimensity 7300 Ultimate प्रोसेसर बसवण्यात आला असून हा प्रोसेसर गेमिंगसाठी ९०FPS ला सपोर्ट करतो.इनफिनिक्स चा हा स्मार्टफोन अँड्रॉइड १५-आधारित XOS १५ या ऑपरेटिंग सिस्टीम वर काम करतो. Infinix Note 50x 5G+ मध्ये IP64 रेटिंग आहे ज्यामुळे अति गर्मी, किंवा धुळीचा कोणताही परिणाम मोबाईलवर होणार नाही.
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Infinix Note 50x 5G+ मध्ये ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा , ५० मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आलाय. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. तसेच मागील बाजूस ड्युअल एलईडी फ्लॅश आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये ५५००mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी ४५W फास्ट चार्जिंग आणि २३००+ चार्ज सायकलसह येते.
सध्याचा जमाना हा AI चा असल्याने इनफिनिक्सने सुद्धा आपल्या नव्या स्मार्टफोन मध्ये अनेक AI फीचर्स दिलेत. यामध्ये AI ऑब्जेक्ट इरेजर, AI इमेज कटआउट, AIGC पोर्ट्रेट मोड, AI Note और Folax AI वॉयस असिस्टेंट यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
nfinix Note 50x 5G+ च्या 6GB+128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी किंमत11,499 रुपये ठेवण्यात आली आहे. तर ८ GB+ १२८ GB स्टोरेज व्हेरिएंट १२,९९९ रुपयांना मिळतोय. हा स्मार्टफोन ग्रीन, पर्पल आणि टाइटेनियम या ३ रंगात लाँच करण्यात आला आहे. येत्या ३ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता हा मोबाईल बाजारात विक्री साठी उपलब्ध असेल.