हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Infinix Note 50X 5G – Infinix ने भारतात त्याच्या Note-Series चा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. नवीन Infinix Note 50X 5G स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7300 Ultimate चिपसेट, Android 15, 5500mAh मोठी बॅटरी आणि 50MP रियर कॅमेरा असे अनेक आकर्षक फीचर्स आहेत. तसेच हा फोन ग्राहकांच्या बजेटमध्ये बसत असल्यामुळे अनेक लोक याकडे आकर्षित होताना दिसणार आहेत. या फोनमधील फीचरमुळे अन डिझाइनने अनेकांना भारावून टाकले आहे. तर चला या भन्नाट फीचरवाल्या फोनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Infinix Note 50X 5G चे फीचर्स –
नवीन Infinix Note 50X 5G स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच HD डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. हा फोन ऑक्टा-कोर 4nm MediaTek Dimensity 7300 Ultimate चिपसेटसह येतो. तसेच डिव्हाइसमध्ये 8GB पर्यंत RAM आणि 128GB स्टोरेज उपलब्ध आहे. कंपनीचा दावा आहे की हा MediaTek Dimensity 7300 Ultimate चिपसेट असलेला हा पहिला फोन आहे. Mem Fusion Technology सह, 6GB RAM वेरियंटला 12GB पर्यंत, आणि 8GB RAM वेरियंटला 16GB पर्यंत एक्सपॅन्ड करता येऊ शकते. हा स्मार्टफोन ड्यूल सिम सपोर्ट करतो. तसेच Android 15 बेस्ड XOS 15 सॉफ्टवेअरवर काम करतो. यामध्ये 5500mAh ची मोठी बॅटरी आहे जी 45W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. या बॅटरीला 10W वायर्ड रिव्हर्स चार्जिंग आणि बायपास चार्जिंग सपोर्ट देखील मिळतो.
कॅमेरा अन AI फीचर्स –
Infinix Note 50X 5G स्मार्टफोनमध्ये ड्यूल कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा आहे. सेल्फी अन व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनच्या रियरवर Active Halo Lighting आहे, जे नोटिफिकेशन्स, कॉल आणि चार्जिंग दरम्यान ऑन होते. यामध्ये One-Tap Infinix AI फंक्शनालिटी आणि AI-बेस्ड फीचर्स जसे की On-Screen Awareness, AI Note, Circle to Search, Writing Assistant, आणि Infinix चा AI Assistant, Folax यांचा समावेश आहे.यासोबतच स्मार्टफोन P64 रेटिंगसह वॉटर आणि डस्ट रेसिस्टंट आहे. यामध्ये DTS पावर्ड ड्यूल स्पीकर्स आणि मिलिटरी-ग्रेड (MIL-STD-810H) ड्यूरेबिलिटी सर्टिफिकेशन देखील आहे.
किंमत –
Infinix Note 50X 5G स्मार्टफोनच्या 6GB RAM आणि 128GB स्टोरेज वेरियंटची किंमत 11,499 रुपये आहे. त्याचबरोबर, 8GB RAM आणि 128GB स्टोरेज वेरियंटची किंमत 12,999 रुपये आहे. हा फोन पर्पल, ग्रीन आणि ग्रे (जांभळा, हिरवा आणि राखाडी) रंगांमध्ये उपलब्ध आहे. “Sea Breeze Green” शेडला व्हिगन लेदर फिनिश दिली आहे, तर बाकीचे दोन रंग मेटॅलिक फिनिशसह येतात.
विक्री 3 एप्रिलपासून Flipkart वर सुरू –
नवीन फोन खरेदी केल्यावर ग्राहकांना 1000 रुपये अतिरिक्त एक्सचेंज बोनस मिळू शकतो. Infinix Note 50X 5G स्मार्टफोनचा बेस वेरियंट 10,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या स्मार्टफोनची विक्री 3 एप्रिलपासून Flipkart वर सुरू होईल.