Infinix Smart 8 Plus : फक्त 6,999 रुपयांत लाँच झाला 50MP कॅमेरावाला मोबाईल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Infinix Smart 8 Plus : प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Infinix चे मोबाईल स्वस्त किमतीसाठी ओळखले जातात. इतर मोबाईल कंपन्यांपेक्षा Infinix च्या स्मार्टफोनच्या किमती कमी असल्याने ग्राहक सुद्धा परडणारा मोबाईल म्हणून Infinix चे मोबाईल खरेदी करत असतात. ग्राहकांची गरज पाहून कंपनीने सातत्याने बजेट मोबाईल सादर करत असते. आताही कंपनीने अतिशय स्वस्तात मस्त मोबाईल बाजारात आणला आहे. Infinix Smart 8 Plus असे या मोबाईलचे नाव असून या स्मार्टफोनची किंमत फक्त 6,999 रुपये आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स जाणून घेउया….

6.6-इंचाचा डिस्प्ले-

Infinix Smart 8 Plus मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. 1612 x 720 पिक्सेल रिझोल्युशन असलेला हा डिस्प्ले 500 nits पीक ब्राइटनेस आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. कंपनीने या बजेट स्मार्टफोन मध्ये MediaTek Helio G36 प्रोसेसर वापरला असून हा मोबाईल Android 13 (Go Edition) आधारित XOS 13 वर वर्क करतो. मोबाईल मध्ये 4GB LPDDR4x रॅम आणि 128GB स्टोरेज दिलेलं आहे. परंतु मायक्रो कार्डच्या मदतीने हे स्टोरेज 2TB पर्यंत वाढवता येते.

कॅमेरा – Infinix Smart 8 Plus

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, फोटोग्राफीसाठी, स्मार्टफोनच्या पाठी मागील बाजूस 50MP प्राथमिक कॅमेरा आणि f/2.0 अपर्चरसह AI लेन्स देण्यात आली आहे. या सेन्सर्सच्या पुढे एलईडी फ्लॅश मॉड्यूल देखील आहे. तर समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 8MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. मोबाईल मध्ये 6,000mAh बॅटरी देण्यात आली असून हि बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, Wi-Fi 5, GPS, ब्लूटूथ v5.0, एक USB-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक सपोर्ट यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.