Infinix ZERO 40 5G : 108MP कॅमेरासह भारतात लाँच झाला नवा 5G मोबाईल; किंमतही तुमच्या बजेटमध्ये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्ही जर चांगल्या कॅमेरा क्वालिटीचा मोबाईल घेण्याचा विचार करत असाल तर मित्रानो, हि बातमी खास तुमच्यासाठीच आहे. भारतीय बाजारात 108MP चाय दमदार कॅमेरसह नवा मोबाईल लाँच झाला आहे. Infinix ZERO 40 5G असं या स्मार्टफोनचे नाव असून यामध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. मोबाईलची किंमत सुद्धा तुम्हाला परवडेल अशीच आहे. चला तर मग आज आपण या नव्या स्मार्टफोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत अगदी सविस्तर माहिती जाणून घेऊयात….

6.74 इंचाचा डिस्प्ले –

Infinix ZERO 40 5G मध्ये 144Hz रिफ्रेश रेटसह 6.74 इंचाचा कर्व्ह AMOLED डिस्प्ले आहे. या डिस्प्लेला 1080 x 2460 पिक्सेल रिझोल्युशन आणि 1300 nits पीक ब्राइटनेस मिळतो. डिस्प्लेचाय संरक्षणासाठी गोरिल्ला ग्लास 5 बसवण्यात आली आहे. इनफिनिक्सने आपल्या या नव्या 5G मोबाईल मध्ये MediaTek Dimensity 8200 Ultimate 5G प्रोसेसर बसवला असून Android 14 वर आधारित ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतोय. स्मार्टफोनला IP54 रेटिंग मिळालं आहे त्यामुळे धूळ आणि पाण्यापासून मोबाईलला कोणताही धोका नाही.

कॅमेरा – Infinix ZERO 40 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Infinix ZERO 40 5G मध्ये पाठीमागील बाजूला 108MP रियर कॅमेरा आहे, तसेच स्मार्टफोनमध्ये 50 MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2 MP डेप्थ सेन्सर देखील आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 50MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. अन्य फीचर्सबाबत बोलायचं झाल्यास यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, यूएसबी टाइप-सी ऑडिओ, स्टिरिओ स्पीकसारखे फीचर्स मिळतात. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5 हजार mAh ची बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 45 वॅट वायर्ड आणि 20 वॅट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

Infinix Zero 40 5G च्या 12GB + 256GB मॉडेलची किंमत 27,999 रुपये आहे तर 12GB + 512GB मॉडेलची किंमत 30,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन वायलेट, टायटॅनियम आणि रॉक ब्लॅक रंगांमध्ये लाँच करण्यात आला असून 21 सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवरून तुम्ही खरेदी करू शकता.