राज ठाकरेंशी संवाद साधण्यास उद्धव ठाकरेंनी दाखवली तयारी?; चर्चांणा उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राजकीय वर्तुळात पक्षांमध्ये फुटाफुटी सुरू असताना दुसरीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या तयारीत दिसत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात लवकरच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा पार पडणार आहे. कारण, आता उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत याविषयावर चर्चा करण्यासाठी तयारी दाखवली आहे. या माहितीमुळे आता राजकिय वर्तुळात देखील वेगवेगळ्या चर्चांणा उधाण आले आहे.

बाळासाहेब ठाकरेंची सर्व जुनी संग्रहित भाषणे राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांच्याकडे आहेत. १९९० पूर्वीच्या काळात श्रीकांत ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंची ही सर्व भाषणे रेकॉर्ड केलेली होती. ही सर्व भाषणे आता राज ठाकरेंकडे आहेत. मात्र या भाषणाची गरज उद्धव ठाकरेंना आहे. या कारणामुळेच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची चर्चा करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठीच हे दोन्ही बंधू एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

याबाबत उद्धव ठाकरे लवकरच राज ठाकरेंशी फोनवर संवाद साधणार असल्याचे सांगितले जात आहे. मुख्य म्हणजे याबाबत कुठलीही अधिकृत माहिती राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आलेली नाही. गेल्या काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र याबाबतच्या सर्व शक्यता राज ठाकरे यांच्याकडून फेटाळण्यात आल्या होत्या. आता पुन्हा एकदा हे दोन्ही बंधू एकत्र येणार असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंशी चर्चा करणार का याबाबत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी माध्यमांना माहिती दिली आहे. माध्यमांचे संवाद साधताना, “स्व. बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं हवी आहेत तर मग इगो कशाला पाहिजे. जो व्यक्ती दुसऱ्यांचे फोन उचलत नाही त्यांना कशाची भीती वाटत आहे. एका भावाने दुसऱ्या भावाला फोन करण्यासाठी कुठल्याही गॅरंटीची गरज नसते” असे संदीप देशपांडे यांना म्हणले आहे.