हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Infosys Hiring 2025 – इन्फोसिस हि भारतातील प्रमुख सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक असून , या कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 11 टक्क्यांहून अधिक नफा वाढवला आहे. कंपनीचा नफा या तिमाहीत सुमारे 6,806 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत 6,106 कोटी रुपये होता. यामुळे इन्फोसिसच्या कामगिरीत मोठा सुधार दिसून आला आहे. त्यामुळे हि कंपनी यंदा काही महत्वपूर्ण निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
कंपनीचा महसूलात 7 टक्क्यांहून अधिक वाढ –
तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल सुमारे 41,764 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे, जो गेल्या वर्षाच्या तुलनेत 7 टक्क्यांहून अधिक वाढ आहे. उत्तर अमेरिकेतील इन्फोसिसच्या व्यवसायात 5 टक्क्यांची वाढ झाली आहे, आणि कंपनीने सांगितले की या आर्थिक वर्षात 4.5 टक्क्यांहून 5 टक्क्यांपर्यंत महसूल वाढीची अपेक्षा आहे.
नव्या कर्मचाऱ्यांची भरती (Infosys Hiring 2025) –
कंपनीने तिसऱ्या तिमाहीत 5,591 नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली आहे, ज्यामुळे एकूण कामकाजी संख्येची वाढ 3,23,379 झाली आहे. इन्फोसिसने घोषित केले आहे की चालू आर्थिक वर्षात आणखी 20,000 हून अधिक कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण गेल्या काही वर्षात इन्फोसिसने फ्रेशर्सच्या जॉइनिंगच्या तारीखांमध्ये विलंब केल्यामुळे कंपनीला टीकेला सामोरे जावे लागले आहे. 2022 मध्ये ज्या तरुण अभियंत्यांना सिस्टम इंजिनीअर म्हणून नियुक्तीची ऑफर देण्यात आली होती, त्यांना कामावर रुजू होण्यासाठी दोन वर्षांहून अधिक प्रतीक्षा करावी लागली. यामुळे आयटी कंपन्यांच्या फ्रेशर्सच्या जॉइनिंग संदर्भातील तक्रारी वाढल्या आहेत. काही संघटनांनी कंपनीला इशारा दिला होता की जॉइनिंगची तारीख पुन्हा ढकलल्यास निदर्शन केली जातील.
कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा –
इन्फोसिस या भारतातील प्रमुख सॉफ्टवेअर कंपनीने कर्मचाऱ्यांना (Infosys Hiring 2025) मोठा दिलासा दिला आहे. इन्फोसिसच्या या कामगिरीने कंपनीच्या नफ्यात वाढ दर्शवली असून, कर्मचाऱ्यांची भरती योजना सॉफ्टवेअर क्षेत्रातील बदलत्या ट्रेंडसाठी उत्तम ठरणार आहे. यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना नोकऱ्या मिळणार आहेत.
हे पण वाचा : थंडी गेली, उकाडा वाढणार; हवामान विभागाचा अंदाज पहाच




