संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पोलीस महानिरीक्षकांकडून पाहणी; दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात 18 जूनला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आगमन होणार आहे. पालखी सोहळ्याच्या ठिकाणी करण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी नुकतीच भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी साताऱ्यातील नीरा दत्त घाट ते लोणंद, तरडगाव येथील पालखी तळ व पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण परिसर, फलटण ते बरड पालखीतळ या मार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांनो पालखी मार्गावर लक्ष ठेऊन कायदा व सुव्यवस्था बिघणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशा महत्वाच्या सूचना केल्या.

यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर आदी अधिकारी उपस्थित होते. पालखी मार्गाची पाहणी केल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा कालावधीत कायदा सुव्यवस्था व वाहतूक सुरळीत रहावी यासाठी पोलीस प्रशासन काटेकोरपणे दक्ष आहेत.

पालखी सोहळा मार्गामध्ये कोणाला काही अडचण आल्यास त्यांनी ताबडतोब पोलिसांची प्रशासनाशी संपर्क साधावा. यासाठी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांचे प्रशासनाचे मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देणार असल्यास देण्यात येणार असल्याचे फुलारी यांनी यावेळी सांगितले.