Facebook, Instagram की Tik Tok?? पहा कोणतं App ठरलं No. 1

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याचे जग हे सोशल मीडियाचे (Social Media) जग आहे. मोबाईलचा वापर दिवसेंदिवस वाढत असून इंस्टाग्राम, फेसबुक, टिकटॉक, स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जगातील यूजर्स दिवसरात्र ऑनलाईन असतात. लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत सर्वच जण सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःच मनोरंजन करत असतात. यातील सर्वात जास्त वापर करण्यात येत असलेले अँप तुम्हाला माहित आहे का? नसेल तर आम्ही सांगतो. मित्रानो, फेसबुक आणि टिकटॉकला मागे सारत Instagram हे जगातील नंबर 1 अँप बनलं आहे.

सेन्सर टॉवरच्या अहवालानुसार, जगात इंस्टाग्राम डाउनलोड करणाऱ्यांच्या संख्येत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2023 मध्ये 767 दशलक्ष वेळा इंस्टाग्राम डाउनलोड करण्यात आलं होते. 2022 या वर्षाच्या तुलनेत हा आकडा 20 टक्क्यांनी वाढला आहे. तर याच वर्षात चिनी अ‍ॅप टिकटॉकला 73.3 कोटी वेळा डाऊनलोड करण्यात आलं. टिक टॉकला भारतात बंदी घालण्यात आली असून अमेरिकेत सुद्धा त्यादृष्टीने पाऊले उचलण्यास सुरुवात झाली आहे. याच कारणांमुळे टिक टॉकचा ग्राफ खाली आला आहे.

इंस्टाग्राम इतके लोकप्रिय कसे?

इंस्टाग्राम हे अत्यंत कमी वेळेत लोकप्रिय अँप ठरलं आहे. तरुण पिढीतील प्रत्येकाचे इंस्टाग्रामवर अकाउंट असल्याचे पाहायला मिळते. इंस्टाग्राम वरून आपण अनोळखी व्यक्तींशी संवाद साधू शकतो, एकमेकांना मेसेज पाठवू शकतो, विडिओ शेअर करू शकतो. इंस्टाग्राम वर रिल्स बनवून अनेक यूजर्स पैसे सुद्धा कमवतात. इंस्टाग्राम रील्समुळेच अँप चे यूजर्स गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. रील फिचर तरुण पिढीमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरत आहे. इंस्टाग्रामच्या वाढत्या लोकप्रियतेचे Reels हे एक प्रमुख कारण आहे.