हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या व्हाट्सअपबरोबर (Whatsapp) सोशल मीडियावर इंस्टाग्राम ॲप (Instagram App) सर्वाधिक लोकप्रिय ठरत आहे. दिवसेंदिवस हे ॲप वापरण्याची संख्या देखील वाढत चालली आहे. त्यामुळेच इंस्टाग्राम आपल्या यूजर्सला वेगवेगळे फीचर्स देताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा इंस्टाग्रामने आपल्या युजर्सच्या सेवेत एक खास फीचर आहे. या फीचरमुळे आता आपल्याला व्हाट्सअप प्रमाणेच इंस्टाग्रामवरील मेसेज एडिट करता येणार आहेत. तसेच कोणतेही चॅट्स पिन करणे शक्य होणार आहे.
आपल्या यूजर्ससाठी आणलेल्या या दोन नवीन फीचरची माहिती इन्स्टाग्रामने आपल्या एक्स हँडलवरुन दिली आहे. इंस्टाग्रामने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “या वर्षाचे दोन महिने कमी झाले आहेत, मात्र इन्स्टाग्राममध्ये दोन नवे फीचर्स जोडले गेले आहेत, तुम्ही आता 15 मिनिटांपर्यंत आपले मॅसेज एडिट करू शकता आणि तुमच्या इनबॉक्सच्या वरती कोणतेही 3 मॅसेज पिन करू शकता”
हे फीचर कसे वापरायचे (Instagram)
तुम्हाला जर इंस्टाग्रामवरील एखादा मेसेज डिलीट करायचा असेल तर त्यासाठी मेसेजवर लाँग प्रेस करावे लागेल. यानंतर एक मेनू तुमच्यासमोर दिसेल. यामध्येच एडिट मेसेज असा पर्याय असेल. यावर क्लिक करून तुम्ही कोणताही मेसेज 15 मिनिटांच्या आत एडिट करू शकता. तसेच एखादे चॅट पिन करायचे असल्यास तुम्हाला मेसेजमध्ये जावे लागेल, यानंतर जे चॅट पिन करायचे आहे, त्यावर लेफ्ट स्वाईप करा. यानंतर पिन पर्याय निवडा. असे तुम्ही तीन चॅट पिन करू शकता.
दरम्यान, इंस्टाग्रामने हे फीचर्स आता लॉन्च केले असले तरी व्हाट्सअपवर हे दोन्ही फीचर्स अगोदर पासूनच उपलब्ध होते. आपल्याला व्हाट्सअपवर देखील अशाच पद्धतीने चॅट पिन करून ठेवता येऊ शकते, तसेच एखादा मेसेज डिलीट करता येऊ शकतो. आता याच फीचर्सचा वापर आपल्याला इंस्टाग्राम वर देखील करता येणार आहे.