WhatsApp वर कोण कोण Online आहे ते लगेच समजणार; लाँच होणार भन्नाट फिचर

WhatsApp Feature
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या व्हाट्सअपचे जगभरात करोडो यूजर्स आहेत. आपल्या यूजर्सना चांगला अनुभव यावा म्हणून कंपनी व्हाट्सअप मध्ये नेहमीच नवनवीन फीचर्स अपडेट करत असते. काही दिवसांपूर्वी व्हाट्सअपने QR कोड संधर्भात फिचर लाँच केलं होते. आता WhatsApp अशा एका फिचर वर काम करत आहे त्यानुसार कोणकोण ऑनलाईन येऊन गेलं ते लगेच आपल्याला समजणार आहे. लवकरच हे फीचर्स यूजर्ससाठी रोल आऊट करण्यात येईल.

व्हॉट्सॲपच्या आगामी वैशिष्ट्यांचा मागोवा घेणारी वेबसाइट WA Beta Info ने याबाबत सांगितले की, मेसेजिंग ॲप एका नवीन फिचरवर काम करत आहे, ज्याच्या मदतीने यूजर्स नुकत्याच ऑनलाइन आलेल्या वापरकर्त्यांची यादी तपासू शकतील आणि त्यांच्या सोबत चॅट देखील करू शकतील. एवढच नव्हे तर WA Beta Info ने एक स्क्रीनशॉट सुद्धा शेअर केला आहे, ज्यामध्ये काही लोकांची नावे दिसत आहे, जे नुकतेच ऑनलाइन आले आहेत आणि अजूनही ऑनलाइन आहेत.

यापूर्वी आपल्याला जर एखादा व्यक्ती ऑनलाईन आहे कि नाही हे पाहायचं असेल तर त्याच्या प्रोफाइल मध्ये जाऊन चेक करावं लागत होते. पण या नवीन फीचरनंतर युजर्स फक्त एका क्लिकवर कोणते युजर्स ऑनलाइन आले आहेत हे तपासू शकतात. सध्या हे नवीन फीचर काही बीटा यूजर्सना देण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत सर्व वापरकर्त्यांसाठी हे फिचर रोल आऊट करण्यात येईल. व्हाट्सअपच्या या फिचर मुळे चॅटिंगचा अनुभव सुधारणार आहे.