Integrated Pensioner Portal | जेव्हा कोणताही व्यक्ती सरकारी नोकरी करत असतो. तेव्हा त्या व्यक्तीला त्याच्या निवृत्तीनंतर पेन्शन स्वरूपात काही रक्कम मिळत असते. त्यामुळे त्यांचे निवृत्तीनंतरचे आयुष्य अगदी सुखकर जाते. आणि त्यांना आर्थिक स्वरूपात जास्त अडचण येत नाही. जर तुम्ही किंवा तुमच्या घरात कोणीही सरकारी नोकरी करत असाल, तर त्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता सरकारने पेन्शनधारकांसाठी एसबीआयच्या सहकार्याने इंटिग्रेटेड पेन्शनर पोर्टल (Integrated Pensioner Portal) नावाने एक ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. आता हे पोर्टल म्हणजे नक्की काय आहे? याचे फायदे पेन्शनधारकांना कशाप्रकारे होणार आहे? आणि हे पोर्टल कोणत्या सुविधा पुरवणार आहे? याची आपण माहिती पाहणार आहोत.
सरकारने सुरू केलेले हे पोर्टल एकूण पाच बँकांच्या पेमेंट सेवा आणि पेन्शन प्रक्रिया एकाच ठिकाणी आणणार आहे. पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाच्या निवेदनात म्हटलेले आहे की, पेन्शन सेवा डिजिटल करण्यासाठी आणि पेन्शनधारकांचे आयुष्य सुसह्य करण्यासाठी सरकारने हे पोर्टल सुरू केलेले आहे.
इंटिग्रेटेड पेन्शन प्लॅटफॉर्म म्हणजे काय? | Integrated Pensioner Portal
पेन्शन संबंधी ज्या काही सेवा आहे. त्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि कार्यक्षमता आणण्यासाठी सरकारने हे प्लॅटफॉर्म सुरू केले आहे. यामध्ये पेन्शन घेणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक आणि सेवा संबंधित तपशील आपल्याला समजू शकतात. म्हणजे सेवानिवृत्त असणाऱ्या लोकांना पेन्शन संबंधीची माहिती एसएमएस किंवा ईमेल द्वारे सर्व माहिती मिळू शकते. यामध्ये सेवानिवृत्ती झालेल्या व्यक्तीला त्याची कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने जमा करायची आहे.
एकात्मिक पेन्शनर्स पोर्टलवरून कोणत्या सुविधा उपलब्ध होतील?
हे पोर्टल सुरू झाल्यानंतर, पाच बँकांमधून पेन्शन घेणारे लोक त्यांच्या पेन्शनशी संबंधित तपशील जसे की जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची स्थिती, फॉर्म-16, भरायच्या आणि प्राप्त झालेल्या रकमेचा तपशील आणि पेन्शन स्लिप पाहू शकतील.
यावर सेवानिवृत्त कर्मचारी त्यांची मासिक पेन्शन स्लिप पाहू शकतात तसेच जीवन प्रमाणपत्र आणि फॉर्म-16 जमा करण्याची स्थिती मिळवू शकतात. तथापि, पूर्वी ही सुविधा फक्त SBI पेन्शनधारकांसाठी होती, परंतु आता SBI, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँकेचे पेन्शनधारक देखील या पोर्टलचा लाभ घेऊ शकतात.




