हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Adolf Hitler) ॲडॉल्फ हिटलर हा जर्मनीच्या नाझी पक्षाचा अध्यक्ष आणि जर्मनीचा हुकूमशहा होता. अत्यंत क्रूर, निर्दयी आणि सनकी हुकूमशहा अशी त्याची ओळख. लोकशाहीचा अवलंब म्हणजे मूर्खपणाचे लक्षण असे त्याचे स्पष्ट मत होते. तर हुकूमशाही सर्वश्रेष्ठ, असा त्याचा ठाम विश्वास होता. त्याची नुसती झलक सुद्धा थरकाप भरवणारी होती. अत्याचाराचे दुसरे नावचं हिटलर होते. अशा या अत्याचारी हुकूमशहाचा इतिहासात उल्लेख आहे. हिटलरचे वर्णन जितके भयंकर आहे तितका दिसायला मात्र तो क्रूर नव्हता. त्यामुळे आजही त्याचे चित्र पाहिले तर त्याच्या चेहऱ्यावरील निर्दयी भावनांआधी त्याचे मोठे डोळे आणि मिशी लक्ष वेधून घेते.
हिटलरच्या मिशीची ठेवण काही वेगळीच होती. (Adolf Hitler) असं सांगतात की, हिटलरने या मिशा शेव्ह करण्यास चक्क मनाई केली होती. इतकंच नव्हे तर, मृत्यूदिवशी त्याने सोव्हिएत सैनिकांच्या हल्ल्यानंतर स्वतःवर गोळी झाडून घेतली होती. तेव्हाही त्याच्या मिशा अगदी कोरीवपणे ट्रिम केल्या गेल्या होत्या. हिटलरच्या या गजब मिशांबाबत क्वचितच कुणाला पूर्ण माहिती असेल. तीच माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
हिटलरच्या गजब मिशीविषयी काही खास गोष्टी (Adolf Hitler)
मित्रांनो, जोनाथन मेयो आणि एम्मा क्रेगी द्वारे लिखित ‘हिटलर्स लास्ट डे: मिनट बाय मिनट’ या नावाच्या पुस्तकामध्ये हिटलरच्या मिशांविषयी काही खास गोष्टी नमूद करण्यात आली आहेत. त्या काय आहेत या जाणून घेऊयात.
1) या पुस्तकात लिहिलंय की, हिटलरचा खासगी न्हावी होता. त्याच नाव ऑगस्ट वोलेनहॉट असं होतं. तो कायम हिटलरचे केस आणि मिशा ट्रिम करत असे. हिटलरच्या मृत्यूनंतर काही सेकंदातच वोलेनहॉट हा त्याचे केस आणि मिशा ट्रिम करण्यासाठी बेडरूममध्ये गेला होता. (Adolf Hitler)
2) याशिवाय असंही लिहिलं आहे की, हिटलर आपल्या मोठ्या नाकाविषयी असुरक्षित होता. त्यामुळे आपलं मोठं नाक झाकण्यासाठी तो मिशांची ही स्टाईल करत असे.
3) हिटलर मिशांची स्टाईल ही अमेरिकेतून उदयास आली होती. इथे ही स्टाईल ‘टूथब्रश स्टाईल’ नावाने ओळखली जायची.
हिटलरने ‘टूथब्रश स्टाईल’ का केली ?
एका शोमध्ये हिटलरच्या टूथब्रश स्टाईलबाबत काही खुलासे करण्यात आले होते. यात सांगण्यात आले होते की, पूर्वी हिटलरच्या मिशा त्याच्या वडिलांसारख्या हँडलबार होत्या. (Adolf Hitler) मात्र पुढे जाऊन हिटलरने हँडलबार मिशा काढून टूथब्रश स्टाईलच्या मिशा ठेवल्या. कारण हिटलर जेव्हा तरूण होता तेव्हा पहिल्या महायुद्धात तो एक सैनिक होता. त्यावेळी युद्धात हँडलबार मिशांमुळे त्याला गॅस मास्क व्यवस्थित लावता आला नव्हता. ज्यासाठी त्याला आपल्या मिशा काढून टाकाव्या लागल्या. म्हणून त्याने भविष्यात हँडलबार मिशांऐवजी टूथब्रश स्टाईल मिशा ठेवल्या.