हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Interesting Facts) जगभरातील जेवढी लोकसंख्या आहे त्यातील फार क्वचितच लोक बियर म्हणजे काय रे भाऊ? असं विचारतील. बाकी सगळ्यांनाच माहीत असेल बियर हा प्रकार नक्की काय असतो. दारू आरोग्यासाठी हानिकारक आहे असं विविध जाहिराती आणि विविध पोस्टरच्या माध्यमातून वारंवार सांगितले जाते. मात्र, तरीसुद्धा मद्यपान करणाऱ्यांची संख्या काही कमी होणे नाही. उलट काही लोक अभिमानाने सांगतात की, आम्ही दारू पितो.
तर काही बहाद्दर लोक असेही आहेत जे सांगतात की, बियर प्यायल्याने आरोग्यदायी फायदे मिळतात. आता आम्ही बियरमुळे फायदे होतात की तोटे याबद्दल काही वाद घालणार नाही. पण बियरच्या बाटल्यांविषयीची एक अत्यंत रंजक गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
तुम्ही पाहिले असेल की बियरच्या बाटल्यांचा रंग हा एकतर हिरवा असतो किंवा तपकिरी. पण या रंगांमागे एक गोष्ट दडली आहे. जी कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. चला तर आज आपण बियरच्या बाटल्यांच्या रंगामागील गोष्ट जाणून घेऊया.
बियरच्या बाटलीचा रंग तपकिरी किंवा हिरवा का असतो? (Interesting Facts)
संपूर्ण जगभरातील पेयांमध्ये बियर तिसऱ्या क्रमांकावर येते. एका रिपोर्टनुसार, दरवर्षी 43, 52, 65, 50, 00, 000 इतके बियरचे कॅन विक्री होतात. जेव्हा चार मित्र एकत्र भेटतात तेव्हा बियरचा प्लॅन झाला म्हणून समजाच. बियर पिणाऱ्यांची संख्या जास्त असली तरी बियरच्या बाटल्यांचा रंग हिरवा किंवा तपकिरी का असतो याविषयी फार क्वचित कुणाला तरी माहीत असेल. आता हे दोनच रंग का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर या मागचं कारण जाणून घेऊया.
(Interesting Facts) बियरची सर्वात पहिली कंपनी प्राचीन इजिप्तमध्ये होती. त्यावेळी पारदर्शक बाटल्यांमध्ये बियरची विक्री केली जायची. कालांतराने बियरचे कॅन आणि पॅक बाजारात आले. पण यामध्ये विकली जाणारी बियर सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे खराब होत असे. आज पॅक झालेल्या बियरला उद्या उग्र वास यायचा. त्यामुळे बिअरची विक्री सर्र्कन कमी झाली. जे उत्पादकांसाठी नुकसानदायी ठरले.
उत्पादकांनी लढवली शक्कल
बियरचा खप वाढवण्यासाठी बियर उत्पादकांनी एक शक्कल लढवली. त्यांनी बियर पॅकेजिंगसाठी कॅन आणि पॅकेटऐवजी ब्राऊन कलर कोटेड बाटल्यांची निवड केली. (Interesting Facts) उत्पादकांची ही युक्ती चांगलीच फायद्याची पडली. रंगीत बाटल्यांमध्ये बियर ठेवल्यानंतर त्यावर सूर्याच्या किरणांचा परिणाम होत नसल्याचे दिसून आले. यामुळे बियरला उग्र वास देखील येत नव्हता आणि परिणामी पुन्हा एकदा बियरची विक्री वाढली. यानंतर उत्पादक तपकिरी रंगाच्या बाटलीतून बियरची विक्री करत होते.
दुसऱ्या महायुद्धानंतर…
पण कालांतराने दुसऱ्या महायुद्धानंतर तपकिरी बाटल्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवू लागला. या काळात तपकीर रंगाच्या बाटल्या बियर विक्रीसाठी मिळत नव्हत्या. त्यामुळे बियर उत्पादकांना काहीतरी दुसरा पर्याय निवडणे गरजेचे होते. अखेर या उत्पादकांनी सूर्यप्रकाशाचा बियरवर होणारा नकारात्मक परिणाम करण्यासाठी तपकिरी रंगानंतर दुसरा रंग म्हणून हिरवा रंग निवडला. दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे पुढे हिरव्या रंगाच्या बाटल्यांमध्ये बियरची विक्री सुरू झाली आणि तेव्हापासून सुरू झालेली विक्री आजही सुरु आहे. (Interesting Facts)