“व्हायरस फॅक्ट्री” बनत चाललेल्या चीनमध्ये आणखी एका व्हायरसचा फैलाव, घेतला ७ जणांचा बळी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । चीन आणि संपूर्ण जग कोरोना व्हायरसमधून सावरलं नसताना चीनमध्ये आणखी एक व्हायरस थैमान घालत आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत ७ लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर ६७ लोकांना या व्हायरसची बाधा झाली आहे. चीनमध्ये पसरलेला हा व्हायरस लवकरच संसर्गजन्य होऊ शकतो. ६ ऑगस्टपर्यंत या व्हायरसने आपली ताकद दाखवून दिली आहे. आतापर्यंत ७ लोकांना आपला जीव गमवावा लागला. या व्हायरसला चीनच्या मीडियाने एसएफटीएस (SFTS) असं नाव दिलं आहे. याबाबतचे वृत्त ‘झी २४’ वृत्तवाहिनीने दिलं आहे.

हा व्हायरस पक्षांमध्ये असणाऱ्या किड्यांच्या चावण्यामुळे होतात. महत्वाची बाब म्हणजे जनावरांचे रक्त पिऊन हा व्हायरस जिवंत राहतो. चीनच्या मीडियाच्या अभ्यासानुसार, हा व्हायरस लवकरच माणसाच्या शरीरात प्रवेश करेल. चीनमध्ये पाठोपाठ अशा व्हायरसची लागण होताना दिसत आहे जो मानवाला घातक आहे.

चीनमध्ये स्वाइन फ्लू पसरवणारा नवीन पद्धतीचा एक व्हायरस सापडला आहे. चीनमधून या वेगवेगळ्या व्हायरसच्या गोष्टी समोर येत असल्यामुळे चीनचा “व्हायरस फॅक्ट्री” नावाने ओळखण्यास सुरूवात होत आहे. तसेच याप्रमाणेच चीन फेक न्यूज पसरवण्याबाबत पण अग्रगण्य आहे. या माध्यमातून ते दुसऱ्या देशांना खतरनाक व्हायरसच्या उपस्थितीचा दावा करून दाखवत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment