ऑस्ट्रेलियात आगीतून वाचलेल्या भुकेल्या प्राण्यांसाठी चालवली जात आहे कौतुकास्पद मोहीम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या वणव्याची आग जरी विझली असली तरी या आगीतून बचावलेल्या प्राण्यांचा जगण्याचा संघर्ष अजून संपलेला नाही आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स सरकारने एक कौतुकास्पद मोहीम हाती घेतली आहे. ‘ब्रश-टेल्ड रॉक वॉब्ली’ हा कांगारू सदृश प्राणी न्यू साउथ वेल्सच्या भूभागात राहणार दुर्मिळ प्राणी. ज्यावेळी जंगलात आग लागली त्याची धग या वन्यजीवांच्या वसाहतींना लागली. अनेक वॉब्लीजनी आपला जीव या आगीत वाचवला. परंतु आता जंगलच बेचिराख झाल्याने प्राण्यांची अन्नाची दैना झाली. अशा परिस्थिती न्यू साउथ वेल्स सरकारने ‘ऑपरेशन रॉक वॅल्बी’ नावाची मोहीम हाती घेतली आहे.

Untitled design - 2020-01-13T204342.008.jpg

या मोहिमेत हजारो किलो गाजर आणि बटाटे या प्राण्यांच्या सध्याच्या वसाहतीत हेलिकॉप्टरच्या साहाय्याने एअरड्रॉप केली जात आहेत. एका आठवड्यापूर्वी न्यू साउथ वेल्स नॅशनल पार्क आणि वाइल्ड लाईफ सर्विसच्या वतीने भुकेल्या वॉब्लीजला अन्न पुरविण्याची ही मोहीम हाती घेतल्या गेली. आतापर्यंत जवळपास २२०० किलो बटाटे आणि गाजर या प्राण्यांपर्यंत एअरड्रॉप करून पुरवली गेली आहेत.

Untitled design - 2020-01-13T204450.771.jpg

न्यू साउथ वेल्सचे पर्यावरण मंत्री मॅट केन याबाबत सांगतात, वॉब्लीज जरी आगीतून पळून जाण्यात यशस्वी झाले असले तरी ते आता आपल्या नैसर्गिक निवासस्थानाबाहेर आहेत. त्यामुळं त्यांना अन्न मिळत नाही आहे. जंगलांना आग लागण्याच्या आधीच दुष्काळामुळे वॅलेबीज आधीच तणावाखाली होते मात्र आता त्यांचे जगणे आव्हानात्मक झाले आहे. त्यामुळं ही मोहीम हातात घेतली गेली आहे. केन पुढे म्हणाले की, जंगलात लागलेल्या आगीनंतरच्या काळात वॉब्लीजची प्रगती जाणून घेण्यासाठी आमची त्यांच्यावर नजर असणार आहे.  मात्र, वन्यप्राण्यांना जगवण्यासाठी न्यू साउथ वेल्सच्या सरकाराकडून घेतले जाणारे हे परिश्रम कौतुकास पात्र आहेत.

Untitled design - 2020-01-13T204544.754.jpg

Leave a Comment