अँमेझॉनमधील आगीमुळे एंडिज पर्वतरांगेतील हिमनग लागले वेगाने विरघळू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
टीम, HELLO महाराष्ट्र | अँमेझॉन जंगल हे पृथ्वीचे फुफुस म्हणून ओळखलं जात. पृथ्वीवरील एकूण प्राणवायूपैकी २० टक्के उत्सर्जन अँमेझॉन जंगलातून होते. त्यामुळं पृथ्वीवर जैवविविधता टिकवून ठेवण्यास अँझोन जंगल मोलाची कामगिरी बजावत आलं आहे.मात्र अँमेझॉन खोऱ्यातील जंगलाला लागलेल्या भीषण आगीचा परिणाम आता पृथ्वीच्या हवामानावर होताना आता दिसत आहेत. अँमेझॉन जंगलापासून सुमारे २ हजार किलोमीटर दूर असलेल्या अमेरिकेच्या एंडिज पर्वतरांगेतील हिमनगांवर होत आहे. आगीमुळं निर्माण झालेल्या धुरातील काळ्या कार्बनमुळे येथील हिमनग वेगाने विरघळत असल्याची बाब एका संशोधनातून उघड झाली आहे.

अँमेझॉनमधील जंगलाला लागलेल्या आगीत जंगलातील मोठ्या प्रमाणावर असलेल्या जैवविविधतेला मोठं नुकसान झाले असून, आगीचा परिणाम हजारो किलोमीटरवरील हिमनगांवरही पाहायला मिळत आहेत. एंडिज पर्वतरांगेतील बर्फामध्ये अँमेझॉन खोऱ्यातील आगीतून निर्माण झालेले धुली कण आढळत असून, यामुळे हिमनग विरघळण्याचे प्रमाण वाढत आहे.

याबाबतचे संशोधन करणाऱ्या ब्राझिल विद्यापीठाच्या तज्ज्ञांच्या गटाने वर्ष २००० ते २००६ दरम्यान घडलेल्या आगीच्या घटना, धुराची स्थिती आणि पाऊस व हिमनगांची विरघळण्याची गती याचा अभ्यास करून आकडेवारी जमा केली आहे. यामधून समोर आलेल्या माहितीनुसार, फक्त आगीतून निघणाऱ्या काळ्या कार्बनमुळे हिमनग विरघळण्याचे प्रमाण ३ ते ४ टक्क्यांपर्यंत आहे; तसेच धुली कण आणि आगीतून तयार होणारे काळे कार्बन एकत्र आल्याने याचे प्रमाण ६ टक्क्यांपर्यंत गेले आहे. तज्ज्ञांच्या मते एंडिज पर्वतरांगेतील हिमनगांमध्ये सापडणाऱ्या धुली कणांवर, आगीचा हिमनगांवर किती परिणाम झाला आहे, हे लक्षात येईल

Leave a Comment