Apple Incची चीनच्या गेमिंग इंडस्ट्रीवर मोठी कारवाई, iOS स्टोअरमधून हटविल्या 30,000 अ‍ॅप्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Apple Inc ने शनिवारी iOS Store in China वरून 29,800 हून अधिक अ‍ॅप्स काढले, त्यातील 26 हजाराहून अधिक अ‍ॅप्स हे गेमिंगसाठी आहेत. चीनची एक रिसर्च फर्म Qimai ने आपल्या एका अहवालात याबाबत माहिती दिली आहे. Apple ने चीनी अथॉरिटीद्वारे विना लायसेंस अ‍ॅप्सबाबत ही कारवाई केली आहे. मात्र, अद्याप या प्रकरणात Apple कडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात Apple ने पब्लिशर्सना स्थानिक सरकारकडून जारी केलेल्या लायसेंस नंबरची माहिती देण्यासाठी जून पर्यंतची मुदत दिली जेणेकरुन यूजर्सना In-App Purchaseची सुविधा मिळू शकेल. चीनच्या अँड्रॉइड अ‍ॅप स्टोअरने या नियमांचे पालन फार पूर्वीच केले आहे. मात्र, अद्याप हे स्पष्ट झाले नाही आहे की Apple या वर्षीच इतका कठोर का झालेला आहे.

गेल्या महिन्यातही अडीच हजार अ‍ॅप्स काढण्यात आले
जुलैच्या पहिल्या आठवड्यातच या स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने त्याच्या अ‍ॅप स्टोअरमधून 2,500 हून अधिक टाइटल्स हटविली होती. या अ‍ॅप्सच्या लिस्ट मध्ये Zynga आणि Supercell सारख्या डेवलपर्सच्या गेमिंग अ‍ॅप्सचा देखील समावेश आहे. या दरम्यान सेंसर टॉवर या रिसर्च फर्मने एका अहवालात याबाबत माहिती दिली.

चीन सरकार गेमिंग इंडस्ट्रीबाबत कठोर
चिनी सरकार दीर्घकाळ चीनमधील गेमिंग इंडस्ट्रीज बाबत कठोर नियम लागू करण्यावर जोर देत आहे जेणेकरून संवेदनशील माहिती आणि कॉन्टेन्ट वर अंकुश ठेवता येईल. अ‍ॅप-मधील खरेदी सुलभ करणार्‍या गेमिंग अ‍ॅप्सची मंजूरी प्रक्रिया खूप जटिल आहे. म्हणूनच चीनच्या गेमिंग अ‍ॅप डेवलपर्स साठी ही समस्या उद्भवली आहे. जगातील सर्वात मोठा गेम डेवलपर्सची इंडस्ट्री चीनमध्ये अस्तित्त्वात आहे.

लहान आणि मध्यम स्तराच्या डेवलपर्ससाठी समस्या
Apple China चे मार्केटिंग मॅनेजरचा हवाल्याने एका मीडिया रिपोर्टमध्ये असे लिहिले आहे की, या कारवाईचा सर्वाधिक परिणाम हा लहान तसेच मध्यम स्तराच्या डेवलपर्सना होईल. त्यांची कमाई देखील कमी होईल. परंतु आता चीनमधील iOS गेम इंडस्ट्रीस बिझनेस लायसेंस मिळविण्याच्या अवघडपणामुळे देखील नुकसान होत आहे.

Appleने 30 जूनपर्यंत दिली मुदत
Qimai च्या रिपोर्ट नुसार फेब्रुवारी 2020 मध्ये Appleने आपल्या अ‍ॅप स्टोअरच्या बॅक स्टेज रिव्यू पेज एक मॅसेज अपडेट केला होता. या मॅसेजमध्ये असे सांगण्यात आले होते की, चिनी कायद्यानुसार या अ‍ॅप्सना ‘जनरल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ऑफ प्रेस अँड पब्लिशिंग हाऊस’ कडून लायसेंस मिळविणे बंधनकारक आहे. हे लक्षात घेऊन आपण हे लायसेंस 30 जून 2020 पर्यंत उपलब्ध करुन द्यावेत. मेनलँड चीनमध्ये सर्व विद्यमान अ‍ॅप्सचे अप्रुवल नंबर अनिवार्य आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment