रशिया पाठोपाठ चीननेही दिली कोरोनावरील लसीला मंजुरी, परंतु..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । कोरोना विषाणूवरील लस शोधण्यासाठी संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक प्रयन्त करत आहेत. त्यातच रशियानंतर आता चीननेही कोरोनावरील लस शोधल्याचा दावा केला असून तिला मान्यताही दिली आहे. पीपल्स डेलीच्या रिपोर्टच्या हवाल्याने दैनिक लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, चिनी वॅक्‍सीन Ad5-nCoV ला पेटेंट मिळालं आहे. या वॅक्सीनला CanSino Biologics Inc च्या मदतीनं तयार केलं आहे. पण रशियाच्या लसीप्रमाणेच, या चीनच्या लसीवरही फेज -3 चाचणीच्या निकालाची वाट न पाहता मंजुरी देण्यात आली असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे ही लस वैज्ञानिक कामगिरीपेक्षा व्यावसायिक कामगिरी मानली जात आहे.

नॅशनल इंटेलेक्‍चुअल प्रॉपर्टी एडमिनिस्‍ट्रेशनने कोरोना लसीचं पेटेंट मिळाल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, या पेटेंटला ११ ऑगस्ट रोजी मंजूरी मिळाली आहे. चीनमधील या वॅक्‍सीनच्या फेज ३ चे जगातील अनेक देशात ट्रायल सुरु आहे. या वर्षाअखेरपर्यंत लस बाजारात येण्याची शक्यता आहे. सऊदी अरबने चिनी लसीच्या फेज ३ ची तयारी सुरु केली आहे. कैन्सिनो बायोलॉजिक्सकडून सांगण्यात आलं की, लसीच्या तिसऱ्या फेजच्या परीक्षणासाठी रशिया, ब्राझिल आणि चिली या देशांसोबत बोलणी सुरु आहे.

दरम्यान, जून मध्येच चिनी सैन्य दलातील जवानांसाठी CanSino बायोलॉजिक्स लस मंजूर झाली होती. ११ ऑगस्ट रोजी चीनच्या इंटलेक्चुअर प्रॉपर्टी अंतर्गत CanSino या लसीच्या पेटंटसाठी मान्यता दिली. चीननं पहिल्यांदाच कोरोना लसीचा मान्यता दिली आहे. त्याच दिवशी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीही रशियन लस Sputnik-V ची घोषणा केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment