इराणने बलाढ्य अमेरिकेविरुद्ध छेडले युद्ध !; मशिदीवर फडकावला लाल झेंडा, पहा व्हिडिओ

तेहरान | कुड्स फोर्सचे प्रमुख मेजर जनरल कासेम सोलेमानी यांच्या निधनानंतर इराणने अमेरिकेविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, इराणच्या क्योम या मुख्य मशिदीवर लाल झेंडा फडकविण्यात आला आहे. इराणच्या सरकारी टीव्ही वाहिनीने हे दाखवून दिले की, पवित्र शहर क्योममधील जामकरन मशिदीच्या घुमटावर लाल झेंडा फडकाविण्यात आला आहे. शिया समुदायामध्ये लाल झेंडा म्हणजे सूड किंवा युद्धाची घोषणा होय.

क्योममध्ये मशिदीवर लाल झेंडा फडकावत लाऊडस्पीकरवर प्रार्थना करण्यात आली, ‘ अल्लाह, तुमचा रक्षक आहे, दुष्ट शक्तीला धडा शिकवा.’ हे प्रेषित मेहदीच्या पुनरुत्थानासाठी आशीर्वाद म्हणून पाहिले जाते, ज्यांचा इस्लामी विश्वास आहे की शेवटच्या क्षणी तो पृथ्वीवरील दुष्टपणाच्या समाप्तीसाठी पुन्हा प्रकट होईल.

प्रथमच फडकावला लाल ध्वज

पवित्र शहर लोक क्योमच्या इतिहासात लाल ध्वज मशिदीवर फडकविण्याची ही पहिलीच वेळ आहे. शनिवारी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनी सुलेमानी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दरम्यान, सुलेमानी यांच्या मृत्यूचा लवकरच बदला घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी आपल्या कुटुंबियांना दिली.  शनिवारी रात्री बगदादमधील अमेरिकन दूतावासाच्या बाहेर रॉकेट हल्ला करण्यात आला. हा हल्ला इराणकडून करण्यात आला होता. अमेरिकन दूतावासाजवळ आणि अमेरिकेच्या एअरबेसवर हा हल्ला झाला. दूतावासाजवळ दोन रॉकेट पडले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com