बलुचिस्तानचा संघर्ष नक्की काय आहे, गेल्या 73 वर्षांपासून त्यांना पाकिस्तानपासून वेगळे का व्हायचे आहे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या अतिरेक्यांनी पाकिस्तानच्या लाहोर शहरावर हल्ला केला. यात चार दहशतवाद्यांसह 10 जण ठार झाले. वास्तविक, फाळणीच्या काळापासूनच बलुचिस्तानमधील लोक वेगळ्या देशाची मागणी करीत आहेत. पाकिस्तानात राहण्याचे त्यांनी कधीच मान्य केले नाही, यामुळे ते सतत संघर्ष करत आहेत. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी ही या मागणीला पाठिंबा देणारी एक अतिरेकी संघटना आहे, जी गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानमध्ये अनेक उपक्रम राबवून आपल्या स्वतंत्र देशाची मागणी करत आहे.

बलुचिस्तान हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाकिस्तानमधील सर्वात मोठा प्रांत आहे. इतर चार प्रांतांच्या तुलनेत इकडची लोकसंख्या सर्वात कमी आहे. ते इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर आहे आणि हे नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध आहे. तेथे गॅस, तांबे आणि कोळशाचे मोठे साठे आहेत. मात्र आताही बलुचिस्तान हा पाकिस्तानातील सर्वात गरीब प्रांत आहे.

चीन येथून नैसर्गिक संसाधनांचा गैरफायदा घेत आहे
अलिकडच्या वर्षांत पाकिस्तानने येथे चीनबरोबर अनेक प्रकल्प सुरू केलेले आहेत आणि ते एकत्रितपणे तेथून मुबलक नैसर्गिक स्त्रोतांचा गैरफायदा घेत आहेत. बलुचिस्तानच्या वालुकामय भागात युरेनियम, पेट्रोल, नैसर्गिक वायू, तांबे आणि इतर धातूंचे मोठे साठे लपलेले आहेत. बलुचिस्तानचे लोक याचा विरोध करत आहेत. बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून पाठिंबा देणार्‍या देशांमध्ये भारत आणि इस्राईलचा समावेश आहे.

पाकिस्तानवर छळाचा आरोप
बलूच राष्ट्रवादी नेत्यांचा असा आरोप आहे की, पाकिस्तानचे केंद्र सरकार त्यांना त्रास देत आहे. ते त्यांना त्यांचा हक्क देत नाहीत. बलूचिस्तानमधील फुटीरतावाद्यांविरूद्ध लढा जिंकत असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे, तर बलूच कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानी सैन्य येथे अपहरण, छळ आणि हत्या करीत आहे, ज्यामुळे तेथे पाकिस्तानविरूद्ध भावना निर्माण होत आहेत.

अनेक दशकांपासून पाकिस्तानवर आहे नाराजी
अनेक दशकांपासून बलुचिस्तानमधील लोकांमध्ये पाकिस्तानविरूद्ध असलेल्या नाराजीच्या भावनेला तेव्हा आग मिळाली जेव्हा 2006 मध्ये पाकिस्तानी लष्कराने बलुचि आदिवासी नेता नवाब अकबर बुगती यांची हत्या केली होती.

फुटीरतावाद्यांना सामान्य लोकांना पाठिंबा
ते स्वतंत्र बलुचिस्तानसाठी लढत असल्याचे फुटीरवाद्यांचे म्हणणे आहे. या लोकांचा मुख्यतः डोंगराळ भागात त्यांचा ठावठिकाणा असतो आणि ते तिथूनच काम करतात पण असं म्हणतात की त्यांना सामान्य लोकांचाही त्यांना चांगला पाठिंबा आहे.

ते पाक राजवटीत कधीच पूर्णपणे राहिले नव्हते
वास्तविक, बलुचिस्तान हा एक प्रांत आहे जो कधीही पूर्णपणे पाकच्या नियंत्रणाखाली आलेला नव्हता. येथे झरदारी सरकारपेक्षा आदिवासी सरदारच अधिक चालतात. या लढाऊ जमातींचे स्वत: चे स्वतंत्र असे कायदे आहेत, त्याअंतर्गत जशास तसे वागण्याची इथे परंपरा आहे.

1947 पासूनच स्वातंत्र्याची मागणी
बलूच फुटीरतावादी आणि पाक सरकार यांच्यातील विभक्ती वाद पाकिस्तानच्या निर्मितीपासून सुरू झाला. एप्रिल 1948 मध्ये पाक सैन्याने मीर अहमद यार खानला जबरदस्तीने आपले राज्य कलात सोडण्यास भाग पाडले होते. त्यांना कलातच्या स्वातंत्र्याविरूद्ध करार करण्यात आला होता, मात्र मीर अहमदचा भाऊ प्रिन्स अब्दुल करीम खान यांना बलुचिस्तानचा 23 टक्के भूभाग पाकिस्तानच्या ताब्यात जाऊ द्यायचे नव्हते. मे 1948 मध्ये अब्दुल करीम खान याने पाकिस्तान सरकारविरूद्ध रणशिंग फुंकले आणि तेव्हापासून हा संघर्ष सतत सुरूच आहे.

या क्षेत्राला सामरिकदृष्ट्याही महत्त्व आहे
अरबी समुद्र आणि होमुजची सामुद्रधुनीच्या सान्निध्यामुळे हा प्रांत रणनीतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हे इराणच्या पूर्वेस आणि अफगाणिस्तानाच्या दक्षिणेस आहे. कोणतीही गॅस किंवा तेल पाइपलाइन जर कतार, इराण किंवा तुर्कमेनिस्तानमधून गेली तर ती बलुचिस्तानमधूनच न्यावी लागेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment