देशातील 1.19 लाख तरुणांना इंटर्नशिपची संधी; दरमहा मिळणार मानधन; येथे करा अर्ज

0
3
Internship opportunity
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशभरातील नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकारी इंटर्नशिप योजनेच्या (Government Internship Scheme) दुसऱ्या टप्प्यात तब्बल ७३८ हून अधिक जिल्ह्यांमध्ये ३०० पेक्षा जास्त नामांकित कंपन्यांमार्फत एकूण १,१९,००० इंटर्नशिप दिल्या जाणार आहेत. या इंटर्नशिपमध्ये रिलायन्स, एचडीएफसी बँक, ओएनजीसी, एनटीपीसी, मारुती सुझुकी, एल अँड टी यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

या इंटरशिपसाठी २१ ते २४ वयोगटातील इच्छुक तरुणांना १२ मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे. इंटर्नशिप योजनेच्यामार्फत उमेदवारांना त्यांच्या पसंतीचा जिल्हा, राज्य आणि क्षेत्र निवडण्याचा पर्याय मिळणार आहे. तसेच, एकावेळी जास्तीत जास्त तीन इंटर्नशिपसाठी अर्ज करता येणार आहे. म्हणजेच, पहिली संधी मनासारखी नसली तर उमेदवार दुसऱ्या किंवा तिसऱ्या पर्यायाचा लाभ घेऊ शकतो.

कोण अर्ज करू शकतो?

सरकारी इंटरनॅशनल योजनेसाठी अर्ज करण्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. अर्जदार संपूर्णवेळ नोकरी किंवा शिक्षण घेत नसावा. तसेच, कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे सरकारी नोकरी नसावी आणि वार्षिक उत्पन्न ४ लाख रुपयांच्या आत असावे.

शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध इंटर्नशिप संधी

१०वी पास – २४,६९६
आयटीआय उत्तीर्ण – २३,६२९
पदविका धारक – १८,५८९
१२वी पास – १५,१४२
पदवीधर – ३६,९०१

इंटर्नशिप कोणत्या क्षेत्रात?

या योजनेअंतर्गत इंधन, गॅस, ऊर्जा, बँकिंग, वित्तीय सेवा, ट्रॅव्हल, ऑटोमोबाईल, धातू व खनिज, उत्पादन आणि एफएमसीजी अशा विविध क्षेत्रांमध्ये इंटर्नशिप करता येणार आहे.

अर्ज कसा कराल?

इच्छुक उमेदवारांना https://pminternship.mca.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

उमेदवाराला मानधनही मिळणार

या इंटर्नशिप योजनेअंतर्गत ५,००० रुपये मासिक मानधन दिले जाणार आहे. त्यामुळे नव्या करिअरची सुरुवात करण्याची ही उत्तम संधी आहे. त्यामुळे इच्छुक तरुणांनी वेळेत अर्ज करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.