शिंदे- फडणवीस यांची मुलाखत : नाना पाटेकरांच्या गोष्टीतील गाढव कोण?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. एका वृत्तपत्राच्या पुरस्कार सोहळ्यात ही मुलाखत घेण्यात आली. यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विविध प्रश्न विचारले. या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी एक गाढवाची गोष्ट सांगितली. यावेळी शिंदे-फडणवीस व्यासपीठावर होते. त्यानंतर आता गाढवाची गोष्टीवरून चांगलेच राजकीय क्षेत्रात चर्चा रंगू लागल्या आहेत. नक्की तो गाढव कोण असा सवालही कार्यकर्ते उपस्थित करू लागले आहेत.

नाना पाटेकर गोष्ट सांगताना म्हणाले, गोष्ट परदेशातील आहे. राजा आणि राणी फिशिंगसाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळी वाटेत त्यांना एक माणूस गाढवावर बसून चालला होता. त्याच्या हातात मासे पडकडण्याचा गळ होता. त्याला राजाने प्रश्न विचारला, काय रे मासे पकडायला निघाला काय? त्यावर तो म्हणाला, नाही महाराज. आज खूप पाऊस पडणार आहे. वादळ-वारेदेखील असणार आहे. त्यामुळे मी मासेमारीला जाणार नाही.

राजा म्हणाला, मूर्ख माणसा, मी खूप पगार देवून हवामान खात्याचा माणूस ठेवला आहे. माझ्या हवामान खात्याच्या माणसाने मला सांगितलंय की, आज पाऊस वगैरे काही नाही. असे बोलून राजा पुढे जातो. पुढे गेल्यावर जोराचा पाऊस होतो, राजाची तारांबळ उडते. राजाला फिशिंग करता येत नाही. मग तो आपल्या राजवाड्यात परततो. राजा त्याच्या हवामान खात्यातील पदाधिकाऱ्याला कामावरून हाकलून देण्याचा आदेश देतो. तसच त्यांच्या माणसांना पाठवून त्या कोळ्याला बोलावून आणायला सांगतो.

राजा त्याला सांगतो की तू आतापासून माझ्यासाठी काम करायचं. तुला हवामान खात्याचा चांगला अंदाज आहे. मला हवामान खात्यातील फारसं काही कळत नाही, असं म्हणत ती व्यक्ती राजाला नकार देते. त्यावर राजा म्हणतो, अरे पण परवा तर तू बरोबर अंदाज सांगितला होतास. त्यावर ती व्यक्ती म्हणते की, मी हा अंदाज वर्तवत नाही. तर माझ्या गाढवाचे कान खाली झुकले की समजतो, आज पाऊस होणार आहे. माझं गाढव हा अंदाज सांगतं. त्यावर राजा म्हणतो की या गाढवाची हवामान खात्यासाठी निवड करा!, अशी गोष्ट नाना यांनी सांगितली. आता राजेशाही जाऊन लोकशाही आली आहे. पण तरीही गाढव पाळण्याची पद्धत काही बदलली नाही! तेव्हा आजही माणसे अपाॅइंटमेंन्ट केली जात आहेत.