Bajaj Finance च्या FD मध्ये गुंतवणूक ठरेल फायदेशीर; वार्षिक 8.60 टक्के व्याजदर मिळतोय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्हाला कमी पैशात जास्त आणि सुरक्षित रिटर्न मिळवायचा असेल तर एफडी हा तुमच्यासाठी आदर्श पर्याय आहे. रेपो रेटमधील वाढीनंतर अनेक बँकांनी आपल्या FD व्याजदरात वाढ केली होती. त्यानंतर आता नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी बजाज फायनान्सने एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. आता तुम्ही बजाज फायनान्समधील तुमच्या गुंतवणुकीवर 40 basis points पर्यंत अधिक परतावा मिळवू शकता. याअंतर्गत 44 महिन्यांच्या विशेष कालावधीसाठी, गुंतवणूकदारांना 8.60% प्रतिवर्ष दराने रिटर्न मिळू शकतो.

बजाज फायनान्सने आपल्या नवीन FD योजनेद्वारे दिलेला हा व्याज दर अधिक असून त्याद्वारे गुंतवणुकीच्या माध्यमातून ग्राहकांन उत्पन्नाची संधी उपलब्ध होईल . 10 मे 2023 पासून बजाज फायनान्सने हि योजना अंमलात असून ज्येष्ठ नागरिक आणि 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या गुंतवणूकदारांना ह्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ मिळू शकतो. 60 वर्षांखालील ठेवीदार दरवर्षी 8.05% पर्यंत कमाई करू शकतात, तर ज्येष्ठ नागरिक प्रतिवर्षी 8.30% पर्यंत रिटर्न मिळवू शकतात. बजाज फायनान्स 44 महिन्यांच्या विशेष कालावधीसाठी सामान्य ग्राहकांसाठी 8.35% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 8.60% ऑफर करत आहे.

बजाज फायनान्स एफडीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वीच तुम्ही तुमच्या परताव्याचा अंदाज घेण्यासाठी ऑनलाइन एफडी कॅल्क्युलेटर वापरू शकता. हे कॅल्क्युलेटर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीची रक्कम,कालावधी आणि मिळणारा रिटर्न जाणून घेण्यास मदत करू शकतो. ह्या योजने अंतर्गत कमाईच्या क्षमतेची कल्पना येण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू या . ज्येष्ठ नागरिक, 60 वर्षांखालील नागरिक बजाज फायनान्स एफडीमध्ये 10 लाख.रु.ची गुंतवणूक करून दीर्घ कालावधी नंतर त्यांच्या गुंतवणुकीवर मॅच्युरिटीनंतर चांगला परतावा मिळू शकतात.

मासिक ठेव योजना

बजाज फायनान्स उद्योगात प्रथमच सिस्टिमॅटिक डिपॉझिट प्लॅन (SDP) ऑफर सुरु करत आहे . जिथे ग्राहक तुम्ही 5000 रु. पर्यंत रक्कम जमा करू शकता. हे म्युच्युअल फंड बाजारातील जोखीम वगळता सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) प्रमाणेच कार्य करते.इथे तुम्ही केलेली प्रत्येक ठेव वेगवेगळ्या छोट्या FD मध्ये गुंतवली जाते, जी एकतर मॅच्युरिटी स्कीम (SMS) अंतर्गत मॅच्युरिटीनंतर वसूल केली जाऊ शकते किंवा मासिक मॅच्युरिटी स्कीम (MMS) अंतर्गत मासिक पे आउटद्वारे मिळवता येते. तुम्ही तुमच्या सोयी अथवा गरजेनुसार तुमची योजना निवडू शकता.