Investment Tips : युवकांनो, पैशाची गुंतवणूक कुठे करावी? फॉलो करा ‘या’ टिप्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Investment Tips : आजच्या महागाईच्या काळात भविष्याच्या दृष्टीने कोणतीही आर्थिक अडचण निर्माण होऊ नये म्हणून आपण महिन्याच्या पगारातून काही पैशाची गुंतवणूक करत असतो. परंतु गुंतवणूक करत असताना ती कुठे करावी आणि आपल्याला त्याबदल्यात किती रिटर्न मिळेल हे जाणून घेणं आवश्यक आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आपली गुंतवणूक ही सुरक्षित असावी. अनेकवेळेला पैशांची गुंतवणूक केली जाते, मात्र, त्यातून हवा तेवढा परतावा मिळत नाही. त्यामुळे पैसे नेमके कुठे गुंतवावे आणि पैसा का वाचवावा हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पगाराच्या 30 टक्के गुंतवणूक

घरचा प्रपंच संभाळत सांभाळत तुमच्या पगारातून काही रक्कम बाजूला काढून तिची गुंतवणूक करावी. तुमचा पगार कितीही असला तरी त्यातील जास्तीत जास्त ३० % रक्कम कुठे ना कुठे तरी गुंतवली पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ, तुमचा पगार २० हजार रुपये असेल तर त्यातील ६००० रुपयांची गुंतवणूक केली पाहिजे. मग तुम्ही हि रक्कम म्युच्युअल फंड, बँक एफडी, पोस्ट ऑफिस योजना किंवा LIC मध्ये गुंतवू शकता. एसआयपी म्युच्युअल फंड सारख्या योजनेत तर तुम्ही २०-३० वर्षासाठी गुंतवणूक करून मोठी रक्कम जमा करू शकता. हीच रक्कम भविष्यात तुमच्यासाठी मोठा आधार ठरेल. जसा जसा तुमचा पगार वाढेल तस तस गुंतवणुकीची रक्कम (Investment Tips) सुद्धा वाढवा.

आपत्कालीन निधी तयार करणं गरजेचं – Investment Tips

जेव्हा तुम्ही पैशाची बचत करता तेव्हा तो निधी इमर्जन्सी साठी उपयोगी पडू शकतो. उदाहरण द्यायचं झाल्यास, समजा अचानक तुमची नोकरी गेली, किंवा तुम्हचा व्यवसाय संकटात सापडला आहे तर अशावेळी तुम्ही साठवलेला आपत्कालीन निधी तुमच्या मदतीला येऊ शकतो. त्यामुळे पैशाची बचत करत आपत्कालीन निधी जमा करा. तज्ञांच्या मते तुमचा कमीत कमी ६ महिन्याचा पगारा एव्हडा पैसा आपत्कालीन निधी म्हणून ठेवावा.

कर नियोजन करा

तुमचे उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला सरकार दरबारी कर भरावा लागतो. सुरुवातीला तुमचा पगार कमी असल्यास तुम्ही कराच्या कक्षेत येत नाही, परंतु हळूहळू पगारात वाढ झाल्यावर तुम्हालाही टॅक्स भरावा लागू शकतो. त्यामुळे हा पैसा वाचवण्यासाठी अशा ठिकाणी रकमेची गुंतवणूक (Investment Tips) करायला हवी ज्याठिकाणी तुम्हाला टॅक्स मध्ये सूट मिळेल. मग हाच वाचलेला पैसे तुम्ही योग्य ठिकाणी वापरूही शकता आणि तुमचा अतिरिक्त खर्चही यातून भरून निघेल.