हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Investment Tips) भविष्यातील आर्थिक अडचणींना तोंड देण्यासाठी आज गुंतवणुक करणे किती महत्वाचे आहे हे आता प्रत्येकाला समजू लागले आहे. त्यामुळे गेल्या काही काळात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसली आहे. दरम्यान, बरेच लोक आपल्या कष्टाचा पैसा योग्य ठिकाणी गुंतवण्यासाठी सुरक्षित आणि चांगला परतावा देणाऱ्या योजनांचा शोध घेत असतात. कारण, अशा योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास आपण कमावलेल्या आणि त्यातून बचत केलेल्या पैशांमध्ये वाढ होते. सुरक्षित आणि निश्चित परताव्याची हमी मिळते.
आज गुंतवणूक क्षेत्रात गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यांपैकी कोणता पर्याय गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे, त्याची निवड करतेवेळी बरेच लोक गडबडून जातात. अशावेळी जर चूक झाली तर मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. (Investment Tips) असे तुमच्या बाबतीत घडू नये म्हणून आज आम्ही तुम्हाला गुंतवणूक करताना कोणत्या चुका करू नये याविषयी सविस्तर माहिती देणार आहोत. तुम्ही गुंतवणुकीसाठी कोणत्याही चांगल्यातल्या चांगल्या पर्यायाची निवड केलात तरीही काही चुका तुमचे आर्थिक नुकसान होण्यास कारणीभूत ठरू शकतात. अशा काही चुकांविषयी आपण माहिती घेऊया.
1. गुंतवणूक करण्यासाठीचा हेतू अस्पष्ट असणे (Investment Tips)
माझ्या मित्राने गुंतवणूक केली म्हणून मी गुंतवणूक करणार, असे बरेच जण म्हणतात. पण गुंतवणूक ही आपल्या भविष्यासाठी करायची असते. त्यामुळे आपण गुंतवणूक करण्याआधी आपला हेतू स्पष्ट हवा. आपण गुंतवणूक का करतोय? कशासाठी करतोय? हे आपल्याला माहित हवे. अर्थात गुंतवणूक करण्याचे आपले ध्येय निश्चित असायला हवे. सेवानिवृत्ती, मुलांचे शिक्षण किंवा आजारपणाच्या काळासाठी पूर्वनियोजित तयारी असा कोणताही उद्देश असो. पण तो निश्चित करायला हवा.
2. मोठ्या फायद्याची हाव असणे
आपल्याला गुंतवणूक केल्यावर चांगला परतावा मिळेल म्हणून तात्काळ वा तात्पुरत्या खरेदी विक्रीच्या पर्यायांची निवड करू नका. असे केल्यास तुमचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. (Investment Tips) तुमचा हेतू अस्पष्ट झाल्याने नुकसानाचा फटका बसू शकतो.
3. विचार न करता घाईत निर्णय घेणे
झटपट श्रीमंतीची स्वप्न पाहणारे अनेकदा घाई करून गडबडीत चुकीचे निर्णय घेतात. ज्यामुळे गुंतवणुकीचे व्यवस्थित व्यवस्थापन होत नाही. इतकेच काय तर अशा घाई गडबडीत घेतलेल्या निर्णयांमुळे गुंतवणुकीतील शिस्त बिघडते. परिणामी मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढते.
4. म्युच्युअल फंडमध्ये ट्रेडिंग करणे
अनेक लोक म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे पसंत करतात. (Investment Tips) म्युच्युअल फंडात गुंतवणूक दीर्घ कालावधी करिता केलेली असते. त्यामुळे मुदत पूर्ण होण्याआधी यातून पैसे काढता येत नाहीत. त्यामुळे जर म्युच्युअल फंडात ट्रेडिंग अर्थात खरेदी विक्री केली तर नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे मुदतपूर्तीआधी असे निर्णय घेऊ नका.
5. मार्केटवर डिपेंड राहणे
बरेच लोक चांगला परतावा या एकमेव गोष्टीसाठी गुंतवणूक करतात. जे चूक आहे. कारण यामुळे आस लागते आणि बरेच जण परताव्याच्या आशेने सतत मार्केटवर अवलंबून राहतात. झटपट फायदा मिळवण्याच्या हव्यासापोटी इथे गुंतवणूकदार चूक करतो आणि नुकसान करून घेतो.
6. पोर्टफोलिओमध्ये वैविध्य नसणे
गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय तसेच क्षेत्र उपलब्ध असतात. (Investment Tips) त्यामुळे गुंतवणूक करताना विविध क्षेत्रांचा अभ्यास करून विविध क्षेत्रात गुंतवणूक करावी. दरम्यान, एकाच क्षेत्रावर अवलंबून राहिल्याने अनेकदा नुकसानाची शक्यता असते. त्यामुळे नवनवीन क्षेत्रांचा अभ्यास करून आणि त्यातील धोक्यांचा अंदाज घेऊन आपल्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणा.
7. गुंतवणुकीचे अनॅलिसिस न करणे
बऱ्याच लोकांना कुणीतरी सांगितलं म्हणून त्या ठिकाणी गुंतवणूक करायची सवय असते. अशावेळी त्यांनी समोरच्याने सांगितलेल्या पर्यायाचा अभ्यास वा समीक्षा म्हणजेच अनॅलिसिस केलेले नसते. यामुळे अनेकदा नुकसानाची शक्यता वाढते. तुम्ही जे काही ध्येय निश्चित केले असेल त्यानुसार तुम्हाला गुंतवणूक करून परतावा मिळेल का याचे अनॅलिसिस केल्यास नुकसानाची शक्यता कमी होते. (Investment Tips)