आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 98 हजार कोटींनी वाढली गुंतवणूकदारांची संपत्ती; सेन्सेक्स 318 अंकावर बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय शेअर बाजाराने आठवड्याच्या पाहिल्याच दिवशी आपली तेजी कायम राखली आहे. आज सेन्सेक्स ३१८ अंक चढत हिरव्या रंगात बंद झाला तर निफ्टीनेही १८४०० च्या दिशेने कूच करण्यास सुरवात केली आहे. आज शेअर बाजारात रियल्टी क्षेत्रात तेजी पाहण्यास मिळाली. सोबतच FMCG, टेलीकॉम, टेक, आयटी, ऑटो शेयरों चे इंडेक्स पण चढत्या किमतीत बंद झाले.

आज गुंतवणूकदारांची संपत्ती जवळपास 98,000 कोटी रुपयांनी वाढली आहे. तर दुसरीकडे युटिलिटी आणि पॉवर क्षेत्रातील शेअर्स च्या किंमतीत घसरण झाल्याचे पाहवयास मिळाले. आज बीएसई चे स्मॉल कॅप आणि मिडल कॅप इंडेक्स अनुक्रमे ०.४७ ते ०.४९ टक्क्यांनी वधारत बंद झाले.सेन्सेक्सच्या सूचीतील ३० पैकी २४ शेअर्स हे आज हिरव्या रंगात बंद झाले तर टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये २.९४ टक्क्यांची तेजी दिसून आली. त्यानंतर टेक महिंद्रा, आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर,लार्सन अँड टर्बो ह्या शेअर्समध्ये १. १४ ते १. ९३ टक्क्यापर्यंत तेजी दिसून आली तर मारुती सुझुकी,टीसीएस,बजाज फिन्सर्व,नेस्ले इंडिया सन फार्मा हे शेअर्स ०. ०५ ते ०. ६३ टक्क्यांनी घसरले.

एकूण शेअर बाजारात ३८२० शेअर्स मध्ये व्यवहार झाल्याचे पाहण्यास मिळाले त्यात १९३७ शेअर्सने हिरव्या रंगात म्हणजेच तेजीत पाहायला मिळाले आणि १७११ शेअर्स हे लाल रंगात व्यवहार केला म्हणजे त्या शेअर्समध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळाली. तर १७२ शेअर्समध्ये आज कुठल्याच प्रकारची हालचाल पाहवयास मिळाली नाही.