iPhone 15 करता येणार घरबसल्या खरेदी; फक्त ‘या’ स्टेप्स करा फॉलो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 22 सप्टेंबरपासून भारतामध्ये Apple चा iPhone 15 खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे iPhone 15 खरेदी करण्यासाठी पहिल्याच दिवशी लांबच्या लांब रांगा पाहिला मिळाल्या आहेत. iPhone 15 खरेदीसाठीची गर्दी पाहूनच लोक हैराण झाले आहेत. यामुळे अनेकांनी शॉपमध्ये जाऊन iPhone 15 खरेदी करण्याचा विषय सोडला आहे. काही ग्राहक ऑनलाइन पद्धतीने iPhone 15 थेट घरी मागवून घेत आहेत. यासाठी त्यांना कोणत्याही रांगेत उभे राहायची गरज पडत नाहीये. हे फक्त त्यांना एका ॲपमुळे शक्य होत आहे.

या लोकांना iPhone 15 घरपोच मागवण शक्य

तुम्ही जर दिल्ली, दिल्ली-एनसीआर, मुंबई, पुणे आणि बंगळुरुमधील रहिवासी असाल तर तुम्हाला थेट आयफोन आपल्या घरी मागवून घेता येईल. त्यासाठी तुम्हाला फक्त एक ॲप डाऊनलोड करायची आवश्यकता आहे. या ॲपमुळे अवघ्या काही तासांमध्ये iPhone 15 तुमच्या घरी आलेला असेल. यासाठी तुम्हाला कोणत्याही रांगेत उभे राहून पाय दुखून घ्यायची गरज पडणार नाही. चला तर मग जाणून घेऊया कोणते ॲप आहे ते?

Blinkit App

तुम्हाला जर कोणत्याही रांगेत उभे न राहता iPhone 15 खरेदी करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम Blinkit ॲप डाऊनलोड करणे गरजेचे आहे. Blinkit ॲपमुळे दिल्ली, दिल्ली-एनसीआर, मुंबई, पुणे आणि बंगळुरुमधील ग्राहकांना आयफोन थेट घरी मागून घेता येईल. परंतु यासाठी तुम्हाला काही आवश्यक स्टेप्स फॉलो करणे गरजेचे आहेत. या स्टेप्स पूर्ण फॉलो केल्यानंतरच तुम्हाला घरबसल्या आयफोन ऑर्डर करता येईल.

या स्टेप्स करा फॉलो

1) सर्वात प्रथम तुम्ही Blinkit App डाऊनलोड करा.

2) यानंतर ॲप ओपन करून त्यावर Buy Now हा पर्याय निवडा आणि सर्व अटी व शर्ती वाचा.

3) तुम्ही नो-कॉस्ट ईएमआयसाठी पात्र आहात का? निकषात बसता का, हे तपासा.

4) या ॲपच्या माध्यमातून एचडीएफसी कार्डधारकांना 5,000 रुपयांची विशेष सवलत देण्यात येत आहे.

5) सर्व अटी व शर्ती मान्य पाहिल्यानंतर Place Order वर क्लिक करा.

6) यानंतर तुम्हाला कोणता आयफोन खरेदी करायचा आहे हा पर्याय निवडा.

7) पुढे त्याचा रंग मॉडेल किंमत या सर्व गोष्टी तपासा.

8) यानंतर तुम्ही निवडलेल्या आयफोनची जी किंमत आहे त्यांचे Payment करा.

9) या सर्व गोष्टी केल्यानंतर तुम्हाला घरपोच iPhone 15 उपलब्ध होईल.