iPhone 15 Discount Offer : छप्परफाड ऑफर!! फक्त 22,849 रुपयांत खरेदी करा iPhone 15

iPhone 15 Discount Offer
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (iPhone 15 Discount Offer) । iPhone … प्रत्येक भारतीयांचा आवडता मोबाईल ब्रँड.. सगळ्यांनाच वाटत आपल्याकडे iPhone असावा..परंतु किंमत जास्त असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना iPhone खरेदी करणं नक्कीच परवडत नाही. आयफोनच्या किमती या आवाक्याबाहेरच्या असल्याने अनेकांचं आयफोन खरेदी करण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहत. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एक ऑफर बद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही अगदी स्वस्तात आयफोन खरेदी करू शकता. दरवर्षीप्रमाणे, अॅपलचे नवीन मॉडेल सप्टेंबर महिन्यात लाँच केले जाऊ शकतात. त्याच्या आधी जुन्या मॉडेल्सवर कंपनी डिस्काउंट ऑफर देत असते. आज आम्ही तुम्हाला ज्या मोबाईलच्या ऑफर बद्दल सांगणार आहोत त्याच नाव आहे iPhone 15…. तुम्हाला मूळ किमतीपेक्षा खूपच कमी किमतीत आयफोन १५ खरेदी करण्याची संधी आहे. कशी ते आम्ही सांगतो.

प्रसिद्ध इ कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट वर iPhone 15 च्या १२८ GB स्टोरेज व्हेरिएंटवर डिस्काउंट देण्यात आला आहे. या मोबाईलची मूळ किंमत ६९,९०० रुपये आहे. परंतु फ्लिपकार्ट वर यावर आधीच ८ % सूट देण्यात आली आहे. त्यानुसार, ६३,९९९ रुपयांना हा मोबाईल लिस्टेड करण्यात आला आहे. मोबाईल खरेदी करताना जर तुम्ही फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक कार्डद्वारे पेमेंट केलं तर तुम्हाला ५% अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल. जर तुम्ही इतर कोणत्याही बँकेच्या कार्डचा वापर करून मोबाईल खरेदी केला तर तुम्हाला ३००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. परंतु सर्वात मोठी ऑफर आहे ती म्हणजे एक्सचचेंज ऑफर….

iPhone 15वर तब्बल ४१,१५० रुपयांपर्यंत एक्सचचेंज ऑफर देण्यात आली आहे. म्हणजेच काय तर तुम्ही तुमचा जुना मोबाईल देऊन ४१,१५० रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळवू शकता. सगळा हिशोब केल्यास, तुम्ही फक्त 22,849 रुपयांत iPhone 15 खरेदी करू शकता. परंतु याठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा कि, एक्सचेंज बोनसचा पूर्ण लाभ मिळविण्यासाठी, तुम्हाला अटी आणि शर्तींनुसार तुमचा मोबाईल बदलावा लागेल. एक्सचेंज डिस्काउंटचा संपूर्ण फायदा फक्त नव्या मॉडेलवर आणि चांगल्या स्थितीत असलेल्या आयफोनवरच घेता येईल.

iPhone 15 ची वैशिष्ट्ये- iPhone 15 Discount Offer

iPhone 15 मध्ये ६.१ इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले देण्यात आला आहे जो २५३२ × ११७० पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. हा र ओएलइडी पॅनल ६०हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालतो. आयफोन १५ मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. बॅक पॅनलवर फ्लॅश लाइटसह एफ/१.६ अपर्चर असलेला ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. त्यासोबत एफ/२.४ अपर्चरसह १२ मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स पण आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी समोरील बाजूला १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. आयफोन १५ मध्ये ३,८७७एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.