अखेर आयपीएल 2021 चं वेळापत्रक जाहीर ; पहिल्याच सामन्यात भिडणार विराट – रोहित

ipl trophy
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतातीलच नव्हे तर जगभरातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेल्या आयपीएल 2021 च वेळापत्रक अखेर जाहीर झाल असून आयपीएलच्या 14 व्या हंगामाची सुरुवात 9 एप्रिलपासून होणार आहे. या 14 व्या मोसमाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. 9 एप्रिल ते 30 मे पर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे.अहमदाबाद, बेंगलुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे हे सामने होणार आहेत.

यंदा एकूण 11 डबल हेडर मॅच खेळवण्यात येणार आहेत. डबल हेडर म्हणजेच एकाच दिवसात 2 सामने. साधारणपणे हे डबल हेडर सामने शनिवार आणि रविवारी खेळवण्यात येतात. गटविजेत्या मुंबई इंडियन्स आणि विराट कोहली च्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आरसीबीच्या संघात पहिला सामना होणार असून विराट – रोहित एकमेकांसमोर उभे राहतील.

दरम्यान, प्ले ऑफचे सामने हे जगातील सर्वात मोठं स्टेडियम असलेल्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. तसेच अंतिम सामनाही याच मैदानात आयोजित करण्यात आला आहे. अंतिम सामना 30 मे ला पार पडणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’