IPL 2023 : Play Off चे Schedule स्पष्ट; पहा कोणत्या संघाचा सामना कधी आणि कोणाबरोबर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल रविवारी रात्री रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यानंतर यंदाच्या आयपीएल मधील प्ले ऑफ चे चित्र स्पष्ट झालं आहे. गुजरातने बंगलुरू विरुद्ध विजय मिळवल्याने मुंबई इंडियन्सला प्ले ऑफ चे तिकीट मिळालं असून गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्स, लखनौ सुपरजायंट आणि मुंबई इंडियन्स हे ४ संघ प्ले ऑफ साठी पात्र ठरले आहेत. आता प्ले ऑफ चे सामने कधी होणार आणि कोणत्या संघाचा सामना कोणाबरोबर होणार हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आयपीएल पॉईंन्ट टेबल मध्ये टॉप २ मध्ये असलेल्या हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्स आणि एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स मध्ये 23 मे रोजी पहिला क्वालिफायर सामना खेळला जाईल. तर दुसरीकडे, खनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये 24 मे रोजी एलिमिनेटर सामना होणार आहे. हे दोन्ही सामने चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहेत. त्यानंतर 26 मे ला क्वालिफायर १ मधील पराभूत संघ आणि एलिमिनेटर सामन्यातील विजयी संघ यांच्यामध्ये क्वालिफायर २ चा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम वर होईल. आणि त्यानंतर 28 मे ला क्वालिफायर 1 चा विजेता आणि क्वालिफायर 2 चा विजेता यांच्यात फायनल सामना होईल.

आयपीएल 2023 प्लेऑफ वेळापत्रक

क्वालिफायर 1 – गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (एमए चिदंबरम स्टेडियम, 23 मे )

एलिमिनेटर – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (एमए चिदंबरम स्टेडियम, 24 मे)

क्वालिफायर 2 – एलिमिनेटर विजेता विरुद्ध क्वालिफायर 1 मधील पराभूत संघ (नरेंद्र मोदी स्टेडियम, 26 मे )

अंतिम क्वालिफायर 1 चा विजेता विरुद्ध क्वालिफायर 2 चा विजेता (नरेंद्र मोदी स्टेडियम, 28 मे )

लीग स्टेजच्या शेवटी कसा होता पॉईंट टेबल

IPL 2023 च्या साखळी टप्प्यात एकूण 70 सामने खेळले गेले. या कालावधीत प्रत्येक संघाला 14-14 सामने खेळण्याची संधी मिळाली. यामधे गतविजेत्या गुजरात टायटन्सने सर्वाधिक १० सामने जिंकत टॉपचे स्थान मिळवलं. चेन्नई सुपर किंग्जने 8 विजयांसह दुसरे स्थान पटकावले. लखनौ सुपरजायंट 17 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर, तर मुंबई इंडियन्स १६ गुणांसह चौथ्या स्थानावर राहिला