IPL 2024 : RCB च्या चाहत्यांना खुशखबर!! AB डीव्हिलियर्स संघात पुन्हा सामील होणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेली इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) 22 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता असून 26 मे रोजी अंतिम सामना होऊ शकतो. त्यामुळे देशातील क्रिकेटप्रेमींमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. आयपीएल मध्ये RCB म्हणजे रॉयल चॅलेंजर बंगळुरूला सपोर्ट करणारे चाहते सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. आयपीएलच्या १६ वर्षाच्या इतिहासात RCB ने एकही ट्रॉफी जिंकली नाही, परंतु विराट कोहली, ख्रिस गेल, एबी डिव्हिलिअर्स, ग्लेन मॅक्सवेल या खेळाडूंमुळे संघाला मोठा पाठिंबा आत्तापर्यन्त मिळत आलाय. आता आरसीबीच्या चाहत्यांसाठी अजून एक खुशखबर आहे. आगामी २०२४ च्या आयपीएल साठी AB डीव्हिलियर्स (AB de Villiers) आरसीबीच्या ताफ्यात सामील होण्याची शक्यता आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, येत्या 17 फेब्रुवारीला एबी डिव्हिलियर्सचा वाढदिवस आहे आणि याच दिवसाचे औचित्य साधून आरसीबी व्यवस्थापन डिव्हिलियर्सला आपल्या संघाचा मार्गदर्शक म्हणजेच मेंटॉर म्हणून घोषित करू शकते. मात्र, याबाबत आरसीबी संघाकडून अद्याप कोणतीही बातमी समोर आलेली नाही. पण असं म्हंटल जात आहे कि एबी डिव्हिलियर्स IPL 2024 मध्ये आरसीबी संघाचा मार्गदर्शक बनू शकतो. एबी डिव्हिलर्सने आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर आत्तापर्यन्त आरसीबीच्या संघाला अनेक अशक्यप्राय विजय मिळवून दिलेले आहेत. त्याने IPL च्या 170 डावात फलंदाजी करत 39.71 च्या सरासरीने आणि 151.69 च्या स्ट्राईक रेटने 5162 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याचा अनुभव आणि मार्गदर्शन नक्कीच आरसीबीच्या संघाच्या कामी येऊ शकतो हे नक्की…..

IPL 2024 साठी आरसीबीचा संघ कसा आहे??

फाफ डू प्लेसिस (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, विल जॅक, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, महिपाल लोमरोर, अनुज रावत, सुयश प्रभुदेसाई, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार विशाक, आकाश मोहम्मद दीप, राजेश रेसे टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, यश दयाल, टॉम कुरन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान.