IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का; स्टार सलामीवीर IPL च्या निम्म्या हंगामाला मुकणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

IPL 2024 : देशातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच IPL २०२४ ची सुरुवात येत्या २२ मार्च पासून होणार आहे. त्याअनुषंगाने सर्वच संघ तयारीला लागले आहेत. मात्र याच दरम्यान, महेंद्रसिंघ धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) मोठा धक्का बसला आहे. चेन्नईचा स्टार्ट डावखुला सलामीवीर डेवोन कॉनवे दुखापतीमुळे सुरवातीचा आयपीएलचा हंगाम खेळू शकणार नाही. कॉनवेच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्याला सध्या आरामाची गरज आहे.

डेवोन कॉनवे (Devon Conway) हा मूळचा न्यूझीलंडचा खेळाडू आहे. न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी त्याच्या दुखापती बद्दल माहिती देताना म्हंटल, की कॉनवेच्या डाव्या अंगठ्याच्या सांध्यामध्ये एक लहान फ्रॅक्चर आहे, तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यादरम्यान जखमी झाला होता आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाईल. यानंतर आठ आठवडे त्याला आराम करावा लागेल. याचा अर्थ तो मेपर्यंत आयपीएलमध्ये (IPL 2024) चेन्नई सुपर किंग्जसाठी उपलब्ध होण्याची शक्यता नाही, परंतु जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी तो तंदुरुस्त असू शकतो. त्यामुळे चेन्नईला जरी झटका बसला असला तरी न्यूझीलंडच्या चाहत्यांना मात्र थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

IPL 2024 मध्ये चेन्नईला उणीव भासणार –

डेवोन कॉनवेची अनुपस्थिती चेन्नईच्या संघाला नक्कीच जाणवेल. कारण ऋतुराज गायकवाड सोबत नेहमीच त्याने चेन्नईला दमदार सलामी करून दिली आहे. शांतपणे, आणि स्ट्राईक रेट नीट ठेऊन टेक्निकल शॉट खेळणाऱ्या कॉनवेला चेन्नईने २०२२ च्या लिलावात त्याला अवघ्या १ कोटी रुपयांना विकत घेतलं होते. त्यानंतर कॉनवेने आत्तापर्यंत IPL मध्ये एकूण २३ सामने खेळले असून त्यामध्ये त्याने ४८. ६३ च्या सरासरीने ९२४ धावा कुटल्या आहेत. IPL मध्ये कॉनवेने ९ अर्धशतके लगावली असून त्याची सर्वोत्तम खेळी ९२ धावांची आहे.