व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

IPL 2024 भारताबाहेर होण्याची शक्यता; मोठं कारण समोर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL) पुढच्या वर्षीच्या आयोजनाबाबत नवे अपडेट समोर येत आहेत.  दरवर्षी क्रिकेटप्रेमी आतुरतेने आयपीएलची वाट बघत असतात, आणि क्रिकेटच्या या झटपट प्रकारचा आनंद घेत असतात, मात्र  IPL २०२४ भारताबाहेर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढच्या वर्षी भारतात लोकसभा निवडणुका आहेत त्यामुळे आयपीएल २०२४ दुसऱ्या देशात खेळवण्यात येऊ शकते. असं झालयास भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी हा सर्वात मोठा धक्का असेल.

आयपीएल स्पर्धा आणि लोकसभा निवडणुका या मार्च ते मे या कालावधीतच होणार असल्याची शक्यता आहे. स्पोर्ट्स तकनुसार, बीसीसीआय सूत्रांनी सांगितलंय की, लोकसभेच्या निवडणुकांमुळे आयपीएलचे एकतर दरवर्षी पेक्षा आधी करायला हवं किंवा जर गरज पडली तर भारताबाहेर करावे लागेल. शक्यतो बीसीसीआय भारतातच परंतु लवकरात लवकर आयोजन करण्याच्या विचारात आहे. यासाठी अजून बराच वेळ आहे तत्पूर्वी आमचं संपूर्ण लक्ष 5 ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेवर आहे. असे बीसीसीआय सूत्रांनी सांगितलं.

यापूर्वी ४ वेळा आयपीएल भारताबाहेर –

दरम्यान, यापूर्वी ४ वेळा आयपीएल स्पर्धा भारत सोडून इतर देशात खेळवण्यात आली आहे. यापूर्वी 2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेत आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते. त्या वर्षीही निवडणुका हेच कारण होते. तसेच यानंतर 2014 मध्ये जेव्हा सार्वत्रिक निवडणुका झाल्या, तेव्हा IPL चे काही सामने भारतात तर काही सामने UAE मध्ये झाले होते. याशिवाय कोरोना काळात भारतात लॉकडाउन असतानाही आयपीएलचे सामने UAE मध्ये आयोजित करण्यात आले होते.