IPL 2024 Live Streaming : उद्यापासून IPL चा महासंग्राम; याठिकाणी Free मध्ये पहा सामन्यांचे थेट प्रक्षेपण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

IPL 2024 Live Streaming : देशातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल २०२४ ला उद्यापासून सुरुवात होणार आहे. यंदा भारतात लोकसभा निवडणुका होत असल्याचे आयपीएल स्पर्धा २ टप्प्यात घेण्यात आली आहे. यातील पहिल्या टप्प्यात फक्त २२ सामने खेळवण्यात येणार आहेत. उद्या रॉयल चॅलेंजर बंगलुरू आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्याद्वारे यंदाच्या आयपीएलचा श्रीगणेशा होणार आहे. या वर्षीचे आयपीएल सामने किती वाजता होणार आहेत? मोबाईल वर फ्री मध्ये थेट प्रक्षेपण कस पाहायचं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जस आम्ही तुम्हाला सांगितलं कि भारतात लोकसभा निवडणुका होत असल्याने सुरुवातीच्या टप्प्यात फक्त २२ आयपीएल सामन्याचे आयोजन करण्यात आलं आहे. देशातील एकूण १० क्रिकेट स्टेडियमवर हे सामने खेळवण्यात येणार आहेत. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आयपीएलचा दुसरा टप्पा आयोजित केला जाईल. तोपर्यंत हे २२ सामने दुपारी ३:३० आणि रात्री ७:३० ला खेळवण्यात येतील. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील पहिला सामना एमए चिदंबरम स्टेडियमवर रात्री 8:00 वाजता सुरु होईल.

TV वर Live सामने कुठे पाहाल – IPL 2024 Live Streaming

जर तुम्हाला टीव्ही वर आयपीएल सामने Live पाहायचे असतील तर तुम्ही Star Sports वर सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.

मोबाईल वरून फ्री मध्ये सामना कसा बघाल –

मोबाईल वरून फ्री मध्ये आयपीएलचे सामने पाहण्यासाठी तुम्हाला Jio Cinema हे अँप डाउनलोड करावं लागेल. Jio Cinema वरून तुम्ही HD क्वालिटी ऑनलाइन स्ट्रीमिंग (IPL 2024 Live Streaming) पाहू शकता.

कोणत्या भाषेत पाहू शकता आयपीएल

Jio Cinema वरून तुम्ही इंग्रजी, हिंदी, भोजपुरी, मराठी, तेलगू, तामिळ, कन्नड, पंजाबी या भाषेमध्ये कॉमेंटरी ऐकू शकता.

IPL 2024 मध्ये किती संघ सहभागी होत आहेत?

आयपीएल 2024 मध्ये एकूण 10 संघ सहभागी होत आहेत.