IPL 2024 Opening Ceremony : अक्षय कुमार, ए. आर रहमान लावणार हजेरी; कुठे आणि कसा पहाल IPL चा उद्घाटन समारंभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

IPL 2024 Opening Ceremony : भारतातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेल्या IPL 2024 ची सुरुवात उद्या म्हणजेच २२ मार्चपासून होणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारी चेन्नई सुपर किंग्स आणि फाफ डुप्लेसीसची रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यात पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. चेन्नईचे होम ग्राउंड असणाऱ्या चेपॉक स्टेडियमवर हा महामुकाबला पाहायला मिळणार आहे. परंतु या सामन्यापूर्वी स्टेडियमवर अतिशय थाटामाटात यंदाच्या आयपीएलचा उदघाटन सोहळा पार पडणार आहे. यावेळी अनेक दिग्गज सितारे चाहत्यांचे मनोरंजन करतील.

उद्या रात्री ८ वाजता चेन्नई आणि बंगळुरू यांच्यातील सामन्याला सुरुवात होईल. मात्र त्यापूर्वीच आयपीएलचा उदघाटन सोहळा पार पडेल. यावेळी चेपॉक स्टेडियमवर बॉलिवूडचे अनेक मोठे स्टार चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसतील.देशातील प्रसिद्ध गायक एआर रहमान आणि सोनू निगम आपल्या गाण्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील, तर बॉलीवूडचा खिलाडी अक्षयकुमार आणि टायगर श्रॉफ हि जोडगोळी आपल्या डान्सने क्रिकेटप्रेमींची मने जिंकतील.

किती वाजता सुरु होणार उद्घाटन समारंभ? IPL 2024 Opening Ceremony

इंडियन प्रीमियर लीगच्या 17व्या हंगामाचा उद्घाटन सोहळा भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल. जवळपास अर्धा तास हा उद्घाटन सोहळा पार पडेल. यावेळी वरील चारही स्टार आपली कला सादर करतील आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करतील. तुम्हाला स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर या सोहळ्याचे (IPL 2024 Opening Ceremony) थेट प्रक्षेपण घरबसल्या पाहता येणार आहे. तसेच मोबाईल वरून सुद्धा तुम्ही Jio सिनेमावर या भव्य दिव्या उदघाटन सोहळ्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग अगदी फ्री मध्ये पाहू शकता.

CSK Vs RCB सामना रंगणार –

उद्या आयपीएलचा पहिला सामना CSK आणि RCB मध्ये रंगणार आहे. कागदावर तरी आरसीबीचा संघ हा चेन्नई पेक्षा काही प्रमाणात संतुलित दिसत आहे. कर्णधार फाफ डुप्लेसीस, विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल हे त्रिकुट बंगळुरूच्या संघासाठी महत्वाचे आहेत. तर चेन्नईकडे सब कुछ महेंद्रसिंघ धोनी असच आहे. सलामीवीर डेवोन कॉन्वे आणि तेज गोलंदाज पॅथीराना दुखापतीमुळे सुरुवातीचे काही सामने खेळणार नाहीत त्यामुळे चेन्नईच्या संघाला धक्का बसला आहे. मात्र ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रवींद्र जडेजा सारखे खेळाडू आणि धोनीचे कल्पक नेतृत्व यांच्या जोरावर कधीही मोठा उलटफेर करण्याची क्षमता चेन्नईच्या संघात आहे.