IPL 2024 Tickets : IPL 2024 च्या तिकीट विक्रीला सुरुवात; असे करा बुकिंग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

IPL 2024 Tickets : इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल हि जगातील सर्वात मोठी आणि श्रीमंत लीग म्हणून ओळखली जाते. यंदाच्या आयपीएलला २२ मार्च २०२४ पासून सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा सुरुवातीला फक्त पहिल्या टप्प्यातच आयपीएल खेळवण्यात येणार आहे. भारतात क्रिकेटला धर्म मानला जातो, त्यामुळे थेट मैदानावर जाऊन खेळाचा आनंद घेणाऱ्या प्रेक्षकांची संख्या जास्त असते. तुम्ही सुद्धा स्टेडियमवर जाऊन आयपीएलचा आनंद लुटणार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण IPL 2024 च्या तिकीट विक्रीला सुरुवात झाली आहे.

असे खरेदी करा आयपीएल तिकीट – IPL 2024 Tickets

इंडियन प्रीमियर लीग 2024 चे संपूर्ण वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. सध्या तरी सुरुवातीच्या फक्त 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उर्वरित सामन्यांच्या तारखा लोकसभा निवडणुकीनंतर जाहीर केल्या जातील. आयपीएलचे सामने देशभरात वेगवेगळ्या मैदानावर होणार असून त्यांच्या तिकिटांची विक्री (IPL 2024 Tickets) सुरू झाली आहे. तुम्ही सुद्धा तरी आयपीएल तिकीट खरेदी करू इच्छित असाल तर तुम्हाला पेटीएम इनसाइडर किंवा बुक माय शो या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

किती रुपये किंमत –

आयपीएल तिकिटांची किंमत ५०० रुपयांपासून ते २०००० रुपयांपर्यंत आहे. प्रत्येक सामन्याच्या तिकिटांची किंमत वेगळी असते, तसेच वेगवेगळ्या सीटनुसार तिकिटांची किंमत सुद्धा वेगवेगळी असते. सध्या पेटीएम इनसाइडरवर काही संघांची तिकिटे उपलब्ध झाली आहेत. यामध्ये दिल्ली, चेन्नई, गुजरात, पंजाब आणि हैदराबाद येथे होणाऱ्या सर्व सामन्यांचा समावेश आहे. क्रिकेटला भारतात असलेलं महत्व आणि क्रिकेटपटुंवरील प्रेम पाहता यंदाची आयपीएल तिकिटांची विक्रीत काही क्षणातच संपू शकतात.