हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन IPL 2025 Final Prediction । आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंडियन प्रीमिअर लीग २०२५ चा अंतिम सामना आहे. रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि पंजाब किंग्स मध्ये ट्रॉफी साठी काटे कि टक्कर पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघानी आजपर्यंत एकदाही आयपीएल चषक न जिंकल्याने आयपीएल ला यंदा नवा विजेता मिळणार हे तर फिक्स आहे. आरसीबी आणि पंजाब या दोन्ही संघाच्या चाहत्यांनी विजयासाठी देव पाण्यात ठेवलेत. विराटची आरसीबी आपला दमदार फॉर्म कायम ठेवत पंजाबला धुळ चारणार कि मुंबईला बाहेर केल्यानंतर आता विराट कोहलीलाही पंजाबचे वाघ धक्का देणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष्य आहे. तत्पूर्वी अनेकांनी आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थात AI ला हा प्रश्न विचारला… त्यावर एआयने दिलेल्या उत्तराची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
तस बघितलं तर, आयपीएल फायनल बाबत ChatGPT, Google Gemini आणि Groke सारख्या वेगवेगळ्या एआय प्लॅटफॉर्मनी जवळपास एकसारखाच अंदाज वर्तवला आहे. एआयनुसार, आरसीबीला आयपीएल २०२५ चा अंतिम सामना (IPL 2025 Final Prediction) जिंकण्याची संधी आहे. काही एआय प्लॅटफॉर्म पंजाब किंग्जला सुद्धा काही कमी लेखत नाहीत, परंतु आरसीबीच जिंकण्याची अधिक शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Grok चा अंदाज काय? IPL 2025 Final Prediction
सर्वात आम्ही grok ला याबाबत विचारलं तर त्याने म्हंटल कि, RCB कडे विजेतेपद जिंकण्याची थोडी अधिक शक्यता आहे. याचे कारण त्यांनी क्वालिफायर 1 मध्ये PBKS वर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला होता, आणि त्यांचा संघ सध्याच्या फॉर्म, खेळाडूंची क्षमता आणि अनुभव यामुळे संतुलित दिसतो. विशेषतः विराट कोहली, रजत पाटीदार यांच्यासारखे फलंदाज आणि जोश हेजलवूड, भुवनेश्वर कुमार यांच्यासारख्या गोलंदाजांमुळे RCB चा संघ खूपच मजबूत वाटतोय. PBKS ची लढाऊ वृत्ती आणि पावसाची शक्यता यामुळे सामना चुरशीचा होऊ शकतो हे खरं असलं तरीही आरसीबीच्या विजयाची गॅरेंटी ६० टक्के राहतेय.
यानंतर ChatGPT ला आयपीएल फायनल मध्ये कोण जिंकेल (IPL 2025 Final Prediction) असं विचारलं असता त्यानेही आपलं मत आरसीबी च्या पारड्यात टाकलं. आरसीबीचा सध्याचा फॉर्म आणि पंजाब विरुद्धचा मागच्या सामन्यातील रेकॉर्ड बघता आरसीसीबीचे पारडं जड असल्याचं मत ChatGPT ने व्यक्त केलं… परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, त्यामुळे कोणत्याही संघाला कमी लेखू शकत नाही. पंजाब किंग्जची अलीकडील कामगिरी आणि श्रेयस अय्यरचे नेतृत्व यांचं मोठं आव्हान आरसीबी समोर असेल असं सांगायलाही ChatGPT विसरलं नाही.